कुर्डूवाडी : जेऊर येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश पाथ्रूडकर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे, नितीन खटके पाटील यांच्या प्रयत्नातून कोरोना लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, आनंद पतसंस्थेचे चेअरमन अभयराज लुंकड, कार्यकारी संचालक डांगे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद पाटील, निकील मोरे, शहाजी कोंडलकर, मेजर आनंद पवार आदींची उपस्थिती होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्याच्या परिस्थितीत युवकांना पोलीस भरती व सैनिक भरतीसाठी आवश्यक करण्यात आलेल्या लसीकरणाच्या नियमामुळे अनेक तरुणांना या लसीकरणाचा लाभ झाला. तसेच व्यापारी पेठेतील व्यापारी व कामगारांना या शिबिराचा फायदा झाला. या उपक्रमाबद्दल सर्वसामान्य जनतेने आमदार संजयमामा शिंदे यांचे धन्यवाद मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय जेऊरचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजिनाथ माने, समीर केसकर, धनंजय गारुडी, सागर लोंढे, शिवम कोठावळे, बाबू शिंदे, अतुल निर्मळ, रणजित कांबळे, लतेश घनवट आदी युवकांनी परिश्रम घेतले.