पुणे : मद्यधुंद अवस्थेत तरुणीने भर चौकात धिंगाणा घातलाय. पुण्यातील हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला आहे. या तरुणीने रस्त्यावर झोपून आरडाओरड करत गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी आले. या मुलीची समजूत काढून तिला रस्त्यावरून बाजूला नेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून सर्वत्र याचीच चर्चा आहे.
पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने मद्यपान करून रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत गाड्या अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा व्हीडिओ आता समोर आला असून सध्या हा व्हीडिओ पुण्यात तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, ही तरुणी कोण याबाबत एकच चर्चा सुरू झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याविषयी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणी मद्यधुंद अवस्थेत थेट रस्त्यावर आडवी झाली होती. सुदैवाने यावेळी तिचा अपघात झाला नाही. कारण ज्यावेळी तरुणी हा सगळा धिंगाणा घालत होती तेव्हा अनेक गाड्या रस्त्यावरुन धावत होत्या. मात्र, तरुणी रस्त्यावर पडल्याचं पाहून अनेक जण तिच्या जवळ येताच आपल्या गाड्यांचा वेग कमी करत होते आणि तिच्या बाजूने आपली गाडी घेऊन जात असल्याचं व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या व्हीडिओमध्ये असंही दिसून येत आहे की, जेव्हा तरुणी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत लोळत होती तेव्हा ती आपल्या समोर थांबलेल्या वाहनांना आपल्यावर या असं सतत खुणावत होती. एवढंच नव्हे तर ती रस्तावर एक बाजूने दुसऱ्या बाजूला अक्षरश: लोळत होती. त्यामुळे या संपूर्ण परिसरात वाहतुकीचा बराच खोळंबा झाला होता.
या संपूर्ण प्रकरणी अद्याप तरी तरुणीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. तसंच ही तरुणी नेमकी कोण आहे आणि तिने अशा प्रकारचं कृत्य का केलं याबाबतची देखील माहिती पोलिसांकडे अद्याप तरी उपलब्ध नाही.