शेगाव : श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज (बुधवार) निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून मल्टीऑगर्न फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं होतं. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांसह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आपल्या नियोजन कौशल्यामुळे जगभरात संत गजानन महाराज संस्थान शिस्त व स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. याच मॅनेजमेंट गुरू म्हणून ख्याती मिळवलेल्या शेगाव संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांची प्रकृती वृद्धापकाळाने बिघडल्याने आज सोशल मीडियात अनेक मेसेज वायरल झालेत. त्यामुळे शेगावात सुद्धा मुख्य बाजारपेठ बंद झाली , रस्ते शुकशुकाट झाले होते.
आज (बुधवार) सायंकाळी 5 वाजता निधन झाले. वयाच्या वृद्धापकाळाने शेगाव येथे त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलेलं आहे. शिवशंकर पाटील यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असून त्यांच्यावर त्यांच्या घरीच एक डॉक्टरांची टीम उपचार करत असल्याचे सांगितले जात होते. शेगावत गर्दी जमू नये ,वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने शेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मात्र त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होते. शिवशंकरभाऊ यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसहीत उपचार सुरू होते. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. शेवटी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही तिथे बोलविण्यात आल्याची माहिती होती.
त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, असं कळवण्यात आलेलं आहे. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.