नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये काल गुरुवारी (ता.१२) रात्री राजौरी जिल्ह्यातील खांडली परिसरात भाजप नेते जसबीर सिंग यांच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये जसबीर यांच्या चार वर्षांच्या भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला झाला तेव्हा जसबीर पूर्ण कुटुंबियांसोबत घरी होते.
१५ ऑगस्टपूर्वी जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादीच्या कारवाई वाढल्या आहेत. १५ अॉगस्टच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी संपूर्ण खोऱ्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तसंच मोठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात केलीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या हल्ल्यात एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या मुलाचां नाव वीर सिंह असल्याचं समजतंय. तो भाजप नेते जसबीर सिंह यांचा भाचा होता. याशिवाय, या हल्ल्यात आणखीन चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भाजपचे राजौरी विभाग प्रमुख नेते जसबीर सिंह आपल्या कुटुंबासोबत आपल्या घरीच निवांत बसले असताना हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेडच्या सहाय्यानं घडवून आणलेल्या या हल्ल्यात जसबीर सिंह मात्र सुदैवाने वाचले आहेत.
भाजपच्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याची दहशतवाद्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वीही अनंतनागमध्ये भाजपशी निगडीत सरपंच गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी यांची हत्या केली होती. आपल्याला दहशतवाद्यांकडून वारंवार धमक्या मिळत होत्या, मात्र सुरक्षेबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचा आरोप कुटुंबानं केलाय.