मुंबई : महान परंपरा, बंधुभाव, करुणा आणि इतरांबद्दल आदर व्यक्त करणारा दिवस म्हणजे ‘नवरोज’. पारशी समुदायाकडून नवरोज म्हणजे पतेती हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातोय. पारशी कालगणनेप्रमाणे आजपासून त्यांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. आजच्या या दिवसाला ‘जमशेद-ए नवरोज’ असंही म्हटलं जातं. भारताच्या विकासात पारशी समुदायाचे महत्वपूर्ण योगदान आहे.
भारतात जवळपास 60 हजार पारशी लोकं राहतात. पारशी लोकांचा धर्म झोरास्ट्रियन आहे, तर ‘अवेस्ता’ पारशी धर्मग्रंथ हा आहे. तुम्ही देखील तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा देत असाल तर ‘पारशी नूतनवर्षाभिनंदन’ किंवा ‘हॅप्पी नवरोझ’ असं म्हणून त्यांचा आनंद दुप्पट करु शकता.
या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी ‘पतेती’ सण आहे. तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ ‘फरवर्दीन’ माहिन्याने होतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार तीन हजार वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो.
हिंदू धर्माप्रमाणेच पारसी धर्माचे लोकही अग्नीची पूजा करतात. हे लोक अग्नीला पवित्र मानतात आणि त्यात यज्ञही करतात. पारशी लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि त्यांच्या पूजास्थळावर म्हणजेच अग्नि मंदिरात जातात आणि प्रार्थना करतात. यानंतर लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तसेच एकमेकांना घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. या उत्सवाची तयारी महिनाभरापूर्वी सुरू केली जाते. या दिवशी लोक आपली घरे साफ करतात. फुलांनी आणि रंगांनी घरांची सजावट करतात. तसेच या दिवशी गोड मिठाई पदार्थ खाले जातात.