नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ऊर्जा पर्याप्तता आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा केली. त्याअंतर्गत पाण्यावर गाडी चालणार आहे. पाण्याच्या मदतीने बनवलेल्या हायड्रोजनने कार चालवता येतील. ही पद्धत केवळ त्या कारसाठीच शक्य होईल, ज्याचे इंजिन हायड्रोजन गॅस इंधनाला सपोर्ट करणारे आहे. पाण्यातून मिळालेले हायड्रोजन इंधन म्हणून वापरता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी भारताची ऊर्जा पर्याप्तता आणि सुरक्षा लक्ष्ये वाढवण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणा केलीय. आजच्या च्या भाषणात पंतप्रधानांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या गरजेवर भर दिला आणि भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
आज देशात होत असलेल्या सर्व कार्यक्रमांपैकी जे भारताला मोठी झेप घेण्यास मदत करतील, ते म्हणजे ग्रीन हायड्रोजनचे क्षेत्र आहे. राष्ट्रीय ध्वजाखाली मी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. भारताला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगत मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लवकरच 100 लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजना सुरू करण्याची घोषणा केलीय.
सध्या भारतात हायड्रोजन वायू बनवण्यासाठी दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. यापैकी एका पद्धतीमध्ये, हायड्रोजन पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून वेगळे केले जाते. म्हणजेच पाण्याच्या मदतीने बनवलेल्या हायड्रोजनने कार चालवता येतील. ही पद्धत केवळ त्या कारसाठीच शक्य होईल, जे हायड्रोजन गॅस इंधनासाठी सपोर्ट करतात. इतर मार्गांनी नैसर्गिक वायूचे हायड्रोजन आणि कार्बनमध्ये विभाजन होते. यातून मिळणारे हायड्रोजन इंधन म्हणून वापरले जाते.
प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेंतर्गत राष्ट्रीय मास्टर प्लॅन विमानतळ, नवीन रस्ते आणि रेल्वे योजनांसह वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि औद्योगिक उपक्रमांना चालना देईल. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल. 2047 पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.