श्रीपूर : सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी झटणारा असा मोठ्या मनाचा कै. सुधाकरपंत परिचारकांसारखा नेता होणे नाही, असे प्रतिपादन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांनी केले. ते श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी भवन येथे बोलत होते.
श्री पांडुरंग परिवाराचे मार्गदर्शक व माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी पुण्यतिथीनिमित्त कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, संचालक नामदेव झांबरे, हरीश गायकवाड, बाळासाहेब शेख, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी सह मान्यवर, कारखान्याचे पदाधिकारी, कामगार यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी कोरोना काळात श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला पांडुरंग कारखान्याच्या वतीने मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच माळशिरस तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ शाखेच्यावतीने श्री पांडुरंग साखर कारखान्याच्या कामगारांना कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. अंकुश भेडगे यांच्यावतीने कोरोना काळात अडचणीत आलेल्या सभासद शेतकऱ्यांना सुधारित ऊस रोपांचे वाटप करण्यात आले. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाटोली जिल्हा सांगली येथील हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमही झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पांडुरंग कारखान्याच्यावतीने वृद्धाश्रम गोपाळपूर येथे जीवनावश्यक वस्तू व फळांचे वाटप ,पंढरपूर पालवी येथे गणवेश वाटप, कुष्ठरोग निर्मूलन निवास पंढरपूर येथे धान्य वाटप, वृद्धाश्रम टेंभुर्णी येथे जीवनावश्यक वस्तू व फळे यांचे वाटप करण्यात आले.
पांडुरंग कारखाना हा कै. सुधाकरपंत परिचारक यांचा आत्मा आहे, कारखाना असेल संस्था असतील या जपणे हीच त्यांना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली असेल, खऱ्या अर्थाने कै. परिचारक यांनी कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी काम केले, समाजकारण केले एखाद्याला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न असायचा आशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी हरीश गायकवाड, बाळासाहेब शेख, संतोष कुमठेकर, सोमनाथ भालेकर, यांच्यासह अनेकांनी कै. सुधाकरपंत परिचारकांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी मुकुंद कुलकर्णी, डॉ. सुधीर पोफळे, रवींद्र काकडे, सोपान कदम, तानाजी भोसले, सय्यदनूर शेख, अनंत कुलकर्णी, महेश देशपांडे, एस एस विभुते, एस वाय सय्यद, नितीन बेनकर, राजेंद्र व्हनमाने, विजय पाटील, अनंत जाधव, अण्णासाहेब भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सुधीर पोफळे यांनी केले.