सोलापूर : सात-बारा उतारा दुरुस्ती करून मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टॉवरवर चढून एका शेतकऱ्याने शोले स्टाईल आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. असं या टॉवरवर चढून अनेकांनी आंदोलनं केली आहेत. त्यामुळे त्या टॉवरच्या बाजूने तारेची जाळी लावण्यात आली आहे.
कुबेर चिमाजी घाडगे, देगाव (ता. पंढरपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. उतारा दुरुस्त केल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेत त्याने, सोबत विषाची बाटली आहे. उतारा दुरुस्त न केल्यास ती पिऊन वरून उडी मारतो, अशी धमकीही दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर तालुक्यातील देगाव इथल्या गट नंबर 341/1, 341/2 अ, 341/2 ब या सातबारा उताऱ्यावरील सर्कल, तलाठी, कोतवाल यांनी बेकायदेशीर नोंदी चुकीच्या पद्धतीने घेतल्याने सातबारा उतारा दुरुस्त करून मिळावा यासाठी कुबेर चिमाजी घाडगे हे आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले.
यावेळी तहसीलदार अंजली मरोड यांनी इमारतीवर चढून टॉवरच्या छतावरील त्या शेतकऱ्याला खाली उतरण्याची विनंती केली, मात्र सातबारा उताऱ्याची त्वरित दुरुस्ती केल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा इशारा दिला. अखेर अग्निशामक दलास पाचारण करून त्या शेतकऱ्याला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या जीवात जीव आला.