नवी दिल्ली : अनेकांच्या मदतीला धाऊन जाणारा अभिनेता सोनू सूद आम आदमी पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामागे कारण म्हणजे आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सूदला ‘देश के मेंटॉर’ या मोहिमेसाठी ब्रँड अँम्बेसेडर केले आहे. यावेळी सोनू आणि केजरीवाल एकत्र आले होते. यानंतर सोनू सूदला राजकारण आणण्याची ही सुरुवात आहे, असे बोलले जात आहे.
अभिनेता सोनू सूदने आज शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर सोनू अभिनय सोडून राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थितीत होत आहे. या भेटीनंतर केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेतली. परिषदेत ते म्हणाले, ‘सोनू सूद सर्वांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असतो देशासाठी तो एक प्रेरणास्थानी आहे.’ या भेटीमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असे प्रश्न देखील विचारण्यात येत आहेत.
या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, ‘आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.’ यावेळी मेंटोर कार्यक्रमाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सोनूची निवड करण्यात आली. त्यामुळे सोनू आता समाजसेवेसाठी कोणती कामे करेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. देश के मेंटोर’ या कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर होण्यास सोनू सूद तयार झाला आहे. शक्यता नोव्हेंबरमध्ये हा कार्यक्रम लॉंच होईल. दिल्लीत देश के मेंटोर हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू होता. आता तो लाँच केला जाईल, असं केजरीवाल म्हणाले. ‘देश के मेंटोर’ या कार्यक्रमानुसार लहान मुलांना करिअरमध्ये कशा प्रकारे पुढे जाता येईल, यासंदर्भात मार्गदर्शक केले जाईल. यामुळे नागरिकांनी पुढे यावं आणि मुलांचं मेंटोर व्हावं, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोनू सूदला पत्रकारांनी निवडणूक लढण्याबाबत आणि राजकीय प्रवेशावर प्रश्न विचारला. यावर सोनू म्हणाला, ‘राजकारणावर चर्चा झालेली नाही. मुलांच्या भविष्याचा प्रश्न हा राजकारणापेक्षा मोठा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय होण्यासाठी ऑफर येत आहेत. पण राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. ज्यांचे विचार चांगले आहेत, त्यांना दिशा नक्की मिळते…’ असं म्हणत सोनूने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, सोनूच्या समाजसेवेची चर्चा आता भारतातच नाही तर जगभरात होत आहे. तो आता भारतीय माध्यमांमध्येही हिरो बनला आहे.
या समाजसेवेमुळे सोनूचं संपूर्ण जगात एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. त्याच्या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. आपल्या करिअर व्यतिरिक्त सोनू समाजसेवेसाठी आपल सगळं पणाला लावतो.