सोलापूर : राष्ट्रवादी पक्षामध्ये माझ्यासह दोन नगरसेवकांचा प्रवेश फिक्स झाला आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदिल दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची औपचारीक भेट राहिली आहे. भविष्यात आपला राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. प्रवेशासाठी कोणतीही अट घातली नाही आगामी निवडणूका महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली होणार हे आपल्यास मान्य आहे. महेश कोठे यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा आहेत. कोठे यांच्यासाठी आपण एक पाऊल मागे घेऊ महेश कोठे यांच्या वाटेतील काटा आपण होणार नाही, असे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सोलापूरच्या रखडलेल्या प्रश्नावर चर्चा केली. याबाबतची माहिती देण्यासाठी आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते म्हणाले सोलापूर शहराचा विकासाचा दृष्टीकोन असणार राष्ट्रवादी पक्ष आहे. खा. शरद पावर
आणि अजित पवार यांच्यामध्ये विकास करण्याची धमक आहे. पुणे बारामती आणि पिंपरीचिवडमध्ये करून दाखवले आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवेशाबाबत हिरवा कंदिल दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची औपचारीक भेट झाली की आपलं राष्ट्रवादी प्रवेश फिक्स आहे. आपल्या समवेत नगरसेवक गणेश पुजारी आणि ज्योती बंमगोडे देखिल प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण शहर जिल्हातील कार्यकत्यांची चर्चा करणार आहे. त्यामुळे तो पर्यंत वेट अॅन्ड वॅचची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी पालिका निवडणूका महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. कोठे यांचे नेतृत्व मान्य आहे का? कोठे शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. याबाबत आपली भूमिका काय असा प्रश्न विचारला असता चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो मान्य करावा लागेल आपण कोणत्या फाययासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत नाही गेल्या पंधरा वर्षात प्रभागातील नागरिकांनी खूप काही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाठी त्यांना मुलभुत सोईसुविधा देण्यासाठी आपण प्रवेश करत आहेत. महेश कोठे यांचे नेतृत्त्व मान्य करावे लागेल कोठे यांच्यासाठी आपण एक पाऊल मागे घेण्यास तयार आहोत. कोठे यांना आमदार होण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहे. कोठे जर शहर उत्तर पूज निवडणूक लढवणार असतील तर आपण कोठे यांच्या वाटेतील काटा होणार नाही असा खुलासा देखिल चंदनशिवे यांनी केला. या पत्रकार परिषदेस नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बंगगडे उपस्थित होते.
* आनंद चंदनशिवेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार का?
नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांच्या अतिशय जवळ गेले आहेत मामांच्या दौर्यात कायमचे सोबत असतात, आनंद चंदनशिवे यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला भरणेमामा जातात, भरणेमामाने आनंददादा आमच्या पक्षात या अशी थेट ऑफर दिली होती.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीत नवीन उर्जा निर्माण झाली. तेव्हा पासून राष्ट्रवादीत अनेक जण प्रवेश करु पाहतायत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेनेचे नेते महेश कोठे, एमआयएमचे नेते तौफीक शेख यांच्यानंतर आता वंचित बहूजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. अशात आनंद चंदनशिवे यांनी सहकारी नगरसेवक गणेश पुजारी, रविकांत कोळेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते.
यावरून चंदनशिवे हे राष्ट्रवादीचा संपर्क वाढला होता ते महेश कोठे सोबत ही वावर वाढला, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळाली. पत्रकारांसमोर चंदनशिवे हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करताना दिसून आले.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. 26) मुंबईमध्ये आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नगरसेवक गणेश पुजारी, चंदनशिवे यांचा भाचा रवीकांत कोळेकर यांची उपस्थिती होती. येणाऱ्या 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोलापूर शहरात आहेत त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत असताना दिसतय.
महेश कोठे हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या बुधवारी छापून आल्या मात्र बुधवारी रात्री उशिरा समजले की महेश कोठे प्रवेश करणार नाही त्यांच्याऐवजी त्यांचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी मध्ये जाणार आहेत. आता चंदनशिवे यांनी भेट घेतली ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आता ऐकण्यास मिळू लागले आहे. बौद्ध व मातंग समाजाच्या मतांच्या गठ्ठयावर आजपर्यंत निवडून आलेले चंदनशिवे यांना राष्ट्रवादीच्या घड्याळवर जनता स्वीकारणार का हासुद्धा मोठा प्रश्न आहे.
महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने ज्यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय प्राप्त केला होता. ते एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख हे देखील आपल्या सहाकारी नगरसेवकांसह राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहे. तौफीक शेख यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हत्येच्या आरोपातून विजयापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एमआयएमने त्यांच्याकडून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेतली. तेव्हापासून पक्षावर नाराज असेलेले शेख हे राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा आहेत. तौफीक शेख यांनी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
आता वंचित बहूजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आनंद चंदनशिवे हे सोलापूर महानगरपालिकेत बहूजन समाज पार्टीच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र सोलापूर लोकसभा निवडणुकांच्यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचा सोलापूरातील प्रमुख चेहरा म्हणून आनंद चंदनशिवे यांच्याकडे पाहिलं जातं. अवघ्या काही दिवसात वचिंतच्या प्रदेश प्रवक्ता पदावर देखील निवड करण्यात आली.
सोलापुरात मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आहे. आनंद चंदनशिवे यांच्या रुपाने बहुजन समाजाचा एक चेहरा राष्ट्रवादीला मिळू शकतो. तसेच आनंद चंदनशिवे हे पालिकेत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्तेत असतात. विविध विषयांवर आंदोलन करत असतात. त्यामुळे आनंद चंदनशिवे यांच्या रुपाने एक आंदोलक चेहरा राष्ट्रवादीला मिळू शकेल, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.