नवी दिल्ली / मुंबई : सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सरासरीपेक्षा ११० टक्के पाऊस होईल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात मध्य भारतातील अनेक भागात सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. महाराष्ट्रातही काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रातही काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे. यात कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा हे ११० टक्के पाऊस होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. १९६१-२०१० या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासात ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याआधीच्या अंदाजावरून अशी माहिती मिळते की, मध्य भारतातील अनेक भागात नेहमीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व भारतातील दक्षिण भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातही काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. यात कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात मात्र पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशात ऑगस्टमध्ये दरवर्षींच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला. मात्र सप्टेंबरमध्ये ही कसर भरून निघेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिल्लीत सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी तुफान पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी १२ वर्षांमध्ये सप्टेंबरच्या एका दिवसात सर्वाधिक अशा पावसाची नोंद दिल्लीत झाली.