नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला दिलासा देण्यास नकार दिला आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. आता जेलमध्येच आसाराम बापूला आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्याची परवानगी मिळेल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. उपचारासाठी दोन महिन्यांचा जामीन मिळावा, अशी विनंती आसाराम बापूने कोर्टाला केली होती.
वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आसाराम बापू यांनी जामीन मागितला होता. तथापि न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला आहे. आयुर्वेदिक उपचार घ्यावयाचे असल्याने तूर्तास शिक्षा लांबणीवर ढकलावी, अशी विनंती आसाराम बापू यांनी वकिलामार्फत केली होती. पण तुम्ही केलेला गुन्हा गंभीर आहे, त्यामुळे तुरुंगाबाहेर सोडू शकत नाही. काय उपचार घ्यायचे ते तुरुंगातच घ्या, अशी टिप्पणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने केली.
बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आम्ही फक्त दोन महिन्यांचा जामीन मागत आहोत, असा युक्तिवाद यावर आसाराम बापूंचे वकील आर. वसंत यांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आसाराम बापू यांचे वय 85 वर्षे आहे, ते तरी विचारात घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. मात्र जामीन देण्यास खंडपीठाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आम्ही फक्त दोन महिन्यांचा जामीन मागत आहोत, असा युक्तिवाद यावर आसाराम बापूंचे वकील आर. वसंत यांनी केला. विनंती फेटाळून जामीन देण्यास खंडपीठाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
* भक्तांचा संताप!
सध्या टेलिव्हिजन क्षेत्रात अभिनेता पर्ल वी पुरीचे प्रकरण खूपच गाजत आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. पॉक्सो कायद्याअंतर्गत पर्ल वी पुरीला पोलिसांनी 4 जूनला अटक केली होती. जवळपास 11 दिवसांनी पर्ल वी पुरीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्याला जामीन मिळाला म्हणून पर्लच्या फॅन्समध्ये आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पर्लला अटक झाल्यानंतर पोलिसांनी पर्लविरोधात पक्के पुरावे असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्याला मिळालेला जामीन पाहून अनेकांनी या जामिनावर प्रश्न उपस्थित केले आहे. यातच आसाराम बापूच्या भक्तांनी सोशल मीडियावर याविरोधात अनेक ट्विट्स करत पर्लला जामीन मिळाल्यामुळे राग व्यक्त केला आहे.