सोलापूर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलबरोबरीने एलपीजी गॅसच्या भरमसाठ किंमती वाढल्याने किचन बजेट कोसळले आहे. त्याचा निषेध करत सोलापुरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारला शेंणाच्या गोवऱ्या भेट दिल्या आहेत.
नगरसेविका तथा शहराध्यक्षा सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी शहरातील पोस्ट ऑफिस येथे अनोखे आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने शेणाच्या गोवर्या पाठवण्यात आल्या.
मोदी सरकारने गेल्या महिन्यात 25 रुपये गॅस दरवाढ वाढ केली. त्यानंतर या महिन्यात पुन्हा 25 रुपये गॅसच्या दरात वाढ केली. इंधन व गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने शेणाच्या गोवर्या पाठवून दरवाढीचा निषेध केला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष रंजना हजारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, दादाराव रोटे, बसु कोळी यांच्यासह सुवर्णा शिवपुरे, झाडे, शशिकला कसपटे, सिया मुलाणी, वंदना भिसे, साधना राऊत, शोभा गायकवाड, मार्था आसादे, रेणुका मंद्रुपकर, आफ्रिन पटेल, संपदा खांडेकर, शोभा सोनवणे, उषार बेसरे, संगीता माणे, मीनाक्षी कांबळे,कोडमुर, पुष्पा राजगुरु, सुनीता भरले, सुवर्णा स्वामी, पूजा ताजणे, ज्योती कानगुंडे, माया जाधव, अनिता पवार, गौरा कोरे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
“आज महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिलांनी इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात निषेध आंदोलन केले, दरवाढ न थांबल्यास तीव्र आंदोलन करु”
– सुनीता रोटे,
शहराध्यक्ष तथा नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस