सोलापूर : हात उसने पैसे देण्याच्या कारणावरुन तरुणाला कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बनशंकरी नगर सोलापूर येथे घडली. याप्रकरणी निखिल जगन्नाथ गायकवाड (वय-२६,रा.सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) याने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून सुबोध उर्फ सोनू सोनकांबळे,प्रशिक सोनकांबळे (दोघे.रा.अवंती नगर) व या दोघांचा अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी निखिल गायकवाड याने संशयित आरोपी सुबोध उर्फ सोनू सोनकांबळे यास हात उसने पैसे दिले होते. त्यानंतर सुबोध सोनकांबळे याने फिर्यादीस हात पुसणे पैसे दिलेले परत करतो माझ्याबरोबर चल असे म्हणून सुबोध याने फिर्यादी याला मोटारसायकलवरून दमानी नगर येथे रस्त्यावर आणले. त्यावेळी या संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी निखिल याने सुबोध याला दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून निखिल याला दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर मोठ्या कोयत्याने फिर्यादी निखिल याच्या डोक्यात,दोन्ही हातावर खांद्यावर, दंडावर,गुडघ्यावर कोयत्याने जबर वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेचा पुढील तपास पोसई भोईटे हे करीत आहेत.
* पोळ्या दिवशी घरात राहण्यावरुन भावाने भावाचे डोके फोडले
बार्शी : माझ्या वडिलाच्या घरात तू का राहतो? तूला मी येथे राहू देणार नाही, असे म्हणत भावाने ट्रॅक्टर चालवून घराची भिंत पाडून भावाचे डोके फोडल्याची घटना तालुक्यातील धामणगाव(दु.) येथे घडली आहे.
याबाबत जखमी दयानंद कुमार देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाऊ परमेश्वर कुमार देशमुख याच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दयानंद देशमुख यांचे आई-वडिल आणि भाऊ परमेश्वर हे शेतातील घरी राहतात व ते गावातील घरी आपल्या कुटुंबासह राहत आहेत. बैल पोळा सणानिमित्ताने त्यांनी बैलांना सजवून त्यांची पूजा केली आणि सायंकाळी गावात घरी येवून ते जेवण करत होते. त्यावेळी लहान भाऊ परमेश्वर हा त्याचा स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रँक्टर हेड घेवुन आला व त्याने तूला येथे राहू देत नाही असे म्हणत ट्रँक्टरने पाठीमागील बाजुने घराच्या भिंतीला धडक देऊन भिंत पाडली.
त्यामुळे भिंतीलगत असलेले संसार उपयोगी साहित्य, कपाट, डब्बे, रँक पाडुन नुकसान झाले. त्याला तु असे का करत आहे असे विचारले त्याने विटाने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे डोके फुटून ते रक्तबंबाळ झाले. यावेळी पोलीस पाटील गणेश मासाळ, विजय पवार यांनी सोडवासोडव केली.