वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सामाजिक शास्त्रज्ञाने केलेला एक अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये सुशिक्षित महिलांना लग्नापूर्वी त्यांचे पहिले मूल हवे आहे. ही इच्छा असणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. तसेच ज्या महिलांनी पदवी मिळवली आहे, त्या महिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माआधी अथवा पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लग्न करणं पसंत केलं आहे.
एका अभ्यासानुसार, सुशिक्षित महिलांना आता लग्नापूर्वी त्यांचे पहिले मूल हवे आहे. ही इच्छा असणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. हा अभ्यास जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सामाजिक शास्त्रज्ञाने केला आहे. सुशिक्षित महिलांमध्ये हा ऐतिहासिक बदल होत असल्याचा त्यांचा दावा आहे. ९० च्या दशकात हे प्रमाण इतकं नव्हतं. एका माध्यमाने या अभ्यासाबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ अँड्र्यू शर्लिन म्हणाले की, ज्या महिलांनी पदवी मिळवली आहे, त्या महिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माआधी अथवा पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लग्न करणं पसंत केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या महिला ज्या सध्या वयाच्या ३० वर्षांच्या पुढे आहेत, त्यापैकी १८ ते २७ टक्के महिला आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माआधी अविवाहित नव्हत्या. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशल अकॅडमी ऑफ सायन्सने हा अभ्यास प्रकाशित केला आहे.
* अशा महिलांच्या प्रमाणात सहापटीने वाढ
हा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतलेल्या महिलांच्या मदतीने करण्यात आला आहे. लग्नाआधी आपलं पहिलं मूल जन्माला घालणाऱ्या महिला या पदवीधारक आहेत किंवा त्याच्या बरोबरीचा एखादा डिप्लोमा त्यांनी केला आहे. १९९६ साली कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आत्ता साधारण ३० वर्षांच्या आसपास वय असलेल्या ४ टक्के महिला आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी अविवाहित होत्या. तर २० वर्षांनंतर अशा शिकलेल्या महिलांमध्ये लग्नाआधी मूल होण्याचं प्रमाण वाढतंय. आता हे प्रमाण सहा पटीने वाढले आहे. आता हे प्रमाण ४ टक्क्यांहून २४.५ टक्क्यांवर आलं आहे.
* एकल पालकत्व संस्कृती वाढतीय
अमेरिकेतल्या महिलांसोबत हा अभ्यास करण्यात आला. कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी लग्न आणि त्याबद्दलच्या संकल्पनांमध्ये झालेले बदल हे या मोठ्या परिवर्तनाला कारणीभूत असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आर्थिक समस्या हेही यामागचं एक कारण असण्याची शक्यता आहे. कुटुंब वाढवण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी पैश्यांची गरज असते. कॉलेजसाठी, शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज आणि पोटापाण्याची साधनं मर्यादित असल्याने त्यांना कुटुंब तयार करण्यासाठी वेळ लागतो. याच कारणामुळे अमेरिकेत सध्या एकल पालकत्व संस्कृती वाढत चालली आहे. त्याचबरोबर लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. याउलट कमी शिकलेल्या महिलांचं लग्न आपल्या अपेक्षेप्रमाणे झालं नसलं तरीही त्या आपलं लग्न टिकवतात आणि तसंच आपलं आयुष्य जगतात. पण त्यांच्यातही काहीवेळा लग्नाआधी एक मूल झालेलं असतं.