सातारा : राज्यात सर्वत्र आपल्या गणरायाचं आगमन झालं आहे. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस दल अलर्ट झाले आहे. सातारा शहरातील रेकॉर्डवरील गुंडांसह 50 जणांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे संशयितांना 10 दिवस सातारा तालुक्यात राहता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे.
सातारा शहर पोलिसांनी रेकाॅर्डवरील 50 जणांची यादी तयार केली असून, त्यांना गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत सातारा शहरातून हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुंड व ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, अशा लोकांची यादी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी काढली होती. यामध्ये तब्बल 50 जण हद्दपारीच्या प्रस्तावामध्ये बसत असल्याचे समोर आले. त्यानंतर शहर पोलिसांनी अशा 50 जणांना 10 दिवसांसाठी सातारा शहरातून हद्दपार केले. जर या 10 दिवसांत हद्दपार केलेले लोक शहरात पोलिसांना आढळून आल्यास त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.
गुरुवारी तहसीलदार आशा होळकर यांनी तात्पुरत्या तडीपारीबाबत महत्वपूर्ण आदेश देत 50 जणांना 10 दिवसांसाठी तडीपार केले. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर गुन्हेगार क्षेत्रात खळबळ उडाली. बॅकफुटवर गेलेले पोलिस या कारवाईने पुन्हा फ्रंटवर आले. तडीपारीचे आदेश झाल्यानंतर शहर पोलिसांचा प्रतिबंधात्मक विभाग ऑर्डर बजावण्यासाठी तयार झाला. तात्पुरत्या तडीपारीमध्ये तानाजी बडेकर, अजय घाडगे, योगेश चोरगे, सनी भिसे, जावेद सय्यद, विकी अडसूळ, संजय माने, रोहित भोसले, विशाल बडेकर या संशयितांसह महागाव येथील सुमारे 13 जणांचा समावेश आहे.
तडीपार केलेल्या संशयितांना आजपासून गणेश् विसर्जन होईपर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येण्यास बंदी राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी देखील तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे फिरताना दिसल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.