मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनसचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत सोलापुरातील चाटला शोरुमच्या चादरीपासून तयार करण्यात आलेला शर्ट निकच्या अंगावर दिसत आहे. त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. झूम करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्यावर SUR म्हणजे सोलापूर आणि चाटला लिहले आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने ३ वर्षांपूर्वी अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. या दोघांमध्ये जवळपास 10 वर्षांचा फरक आहे. प्रियंका वयाने मोठी आहे. प्रियांकाने लग्न हे परदेशात नाही तर आपल्या देशातच केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रियांकाने राजस्थानच्या उदयपुरमध्ये निकसोबत लग्न केले. तिचे हे शाही लग्न लोकांच्या अजूनही लक्षात आहे, एवढंच नाही तर त्याचे फोटो देखील अजून व्हायरल होतात. मात्र, या शाही लग्नात किती खर्च झाला आणि हा खर्च कोणी केला? याविषयी प्रियांकाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या लग्नाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘आमच्या लग्नात झालेला संपूर्ण खर्च एकतर्फी नव्हता, तर संपूर्ण लग्नात जो खर्च होता तो दोन्ही बाजूंनी केला होता. निक आणि मी लग्नाचा संपूर्ण खर्च वाटून घेतला होता. पण फक्त एका गोष्टीसाठी निकने खर्च उचलला. ते म्हणजे, साखरपुड्याची अंगठी निक स्वत: घेऊन आला होता. आम्ही लग्नाची तयारी करत असतानाच सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या. यात दागिण्यांपासून कपड्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या,’ असे प्रियांका म्हणाली.