पुणे : पुणे महानगर पालिकेतील एक कर्मचारी डोक्यावर झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सराईत गुन्हेगार बनला. त्यानं कर्ज फेडण्यासाठी 50 महागडे फोन चोरले. दरम्यान आरोपी कर्मचारी रस्त्यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चोरीचा मोबाइल विकत होता. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 88 हजार रुपये किमतीचे 21 मोबाइल जप्त केले आहेत. तानाजी शहाजी रणदिवे असं अटक केलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे.
दरम्यान आरोपी कर्मचारी रस्त्यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चोरीचा मोबाइल विकत होता. पण पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्या पार्ट टाइम चोरीच्या व्यावसायाचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 88 हजार रुपये किमतीचे 21 मोबाइल फोन जप्त केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तानाजी शहाजी रणदिवे असं अटक केलेल्या 33 वर्षीय आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी रणदिवे हडपसर परिसरातील रामटेकडी, शांतीनगर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागात काम करतो. मागील काही दिवसांपासून आरोपी रणदिवे याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपीनं मोबाइल चोरी करण्याचा नवीन पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला होता. पण त्याचा हा लुटमारीचा व्यवसाय फार काळ टिकला नाही.
ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत असताना, आरोपी तानाजी रणदिवे याठिकाणी चोरीचे मोबाइल विकायला येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीवर नजर ठेवून होते. त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत त्याची चौकशी केली असता, त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसी खाक्या दाखवताच तो पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. तसेच कर्ज फेडण्यासाठी मोबाइल चोरी केल्याचं कबुल केलं आहे.