मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. अनेक वेळा त्याला ट्रोल करण्यात येतं. मात्र आज तैमुरचा एक वेगळाच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो गणरायाची पूजा करताना दिसत आहे. इतकंच नाही तर तैमुरने स्वतःच्या हाताने बाप्पा साकारला आहे. मातीपासून त्याने सूंदर मूर्ती साकारली आहे. तसेच या फोटोत सैफ आणि करिना हे दोघेही दिसत आहेत.
करीना कपूरने शेअर केलेल्या या फोटोंवर सैफिनाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये खास करून हात जोडलेल्या तैमूरने नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या फोटोंवरुनही धार्मिक कमेंट करत करीना आणि सैफवर निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजेच सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरीदेखील गणपती बाप्पाची पूजा पार पडली. नुकतचं धर्माबद्दल आपलं वक्तव्य मांडल्यामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान बाप्पासमोर मात्र नतमस्तक झालेला दिसून आला.
करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटो शेअर करत चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने शेअर केलेल्या फोटोत ती सैफ आणि तैमूर सोबत दिसतेय. यात सैफ आणि तैमूर गणपती बाप्पापुढे हात जोडून उभे असल्याचं दिसून येतंय. सोबतच करीनाने तैमूरने तयार केलेल्या रंगीत मातीच्या बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन दिलंय. “माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत आणि टीमच्या क्यूट रंगीत मातीच्या गणपतींसोबत गणेशोत्सव साजरा करत आहे.” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.