मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पीडितेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेवर एका नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला होता. पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवण्याचं संतापजनक कृत्य नराधमाने केले होते. आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोषीला कठोर शिक्षा होईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईतील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियातून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. साकीनाकातील घटना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणासारखी आहे. महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवून तिच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आला आहे. या संतापजनक प्रकाराने महाराष्ट्रात हे काय सुरू आहे, असा सवाल केला जात आहे. गेल्या दहा दिवसात पुण्यातही बलात्काराच्या गंभीर घटना घडल्या आहेत.
या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. त्यातच आता या प्रकरणातील आरोपींना 10 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींना कठोर शिक्षा सुनावली जाईल, असं म्हटलं आहे.
पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.सैतानालाही लाजवेल असं कृत्य आरोपीने केलं होतं. पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपीने केलेल्या या कृत्त्यात पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती. आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली होती की, पीडित महिलेसोबत तिची आई आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, गेली 10-12 वर्षांपासून जो इसम टेम्पोजवळ सापडला त्याच्यासोबत राहत होती आणि त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाबाबत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन सांगितले. ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पीडित महिला रक्तबंबाळ अवस्थेत टेम्पोत आढळून आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे.
* मुंबई साकीनाका बलात्कार : मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले…
साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले…
– जखमी महिलेला स्वत: पोलिसांनी गाडी चालवत राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं
– सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीला पकडण्यात आलं
– आरोपीचं नाव मोहन चौहान असून, तो उत्तर प्रदेशचा राहणारा आहे.