नवी दिल्ली : एक मोठं सौरवादळ येणार असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. या सौरवादळामुळे पृथ्वीवरची इंटरनेट सेवा बंद होण्याची भीती ‘नासा’ च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. सौरवादळांमुळे पृथ्वीच्या बाहेरचं वातावरण अगदी उष्ण होतं. यामुळे जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्ही इत्यादी गोष्टींवर परिणाम होतो. तसंच, अवकाशातले ट्रान्सफॉर्मर्स निकामी होण्याचीही शक्यता असते.
पृथ्वीवरील आतापर्यंत सर्वात मोठे सौर वादळाचे थैमान हे 1859 ते 1921 या काळात आले होते. या काळात संदेशवहन नव्हते तर इंटरनेट तर नव्हतेच नव्हते. त्यामुळे यावेळीला इंटरनेटवर प्रभाव पडू शकतो. सौर वादळे शक्यतो 100 वर्षातून एकदाच येत असतात. पण त्यामुळे इंटरनेटसंबंधीच्या सुविधा या उखडून टाकल्या जाऊ शकतात आणि त्या बंद पडतील असे एका अहवालात सांगण्यात आले आहे.
संगिता ज्योती या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल याचवर्षी 2021 मध्ये सादर करण्यात आला आहे.
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र मानवाचे सुर्यापासून येणाऱ्या धोकादायक किरणोत्सर्गापासून संरक्षण करते. पण, आता शास्त्रज्ञांचा असा दवा केलाय की, सुर्यावरील वादळांचा आपल्या उपग्रहावर मोठा परिणाम पडू शकतो. यामुळे आपल्या इंटरनेटसह काही तंत्रज्ञानावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नासाने सांगितल्यानुसार सांगिल्यानुसार, सर्वसाधारणपणे सौर वादळे 10-20 दशलक्ष मैल प्रती तास वेगाने फिरतात. ते सुर्याच्या कोरोनल होल्समधून उत्पन्न होतात. याशिवाय, सुर्यप्रकाशाच्या स्फोटामुळे कोरोनल मास इजेक्शनदेखील होऊ शकते. तसेच, सौर वाऱ्यांसह आपल्या जवळच्या ताऱ्यातून बाहेर पडणारे विकिरण पृथ्वीवर येतात. हे चार्ज कण अवकाशात प्रवास करतात आणि अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आल्यानंतर प्रचंड उर्जा प्रकाशाच्या स्वरुपात सोडली जाते. त्याला ‘औरा’ असेही म्हणतात.
शास्त्रज्ञांच्या मते, या सुर्यावरील वादळांचा परिणाम उपग्रहावर आधारित तंत्रज्ञानावर होऊ शकतो. तसेच, सौर वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते. याचा परिणाम जीपीएस नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि टीव्हीच्या सिग्लनमध्ये होऊ शकतो. याशिवाय विजेचा प्रवाह वाढून ट्रान्सफॉर्मर जळू शकते. 1859 आणि 1921 मध्ये अशा वादळांचा प्रभाव पृथ्वीवर दिसला होता. 1859 मध्ये सर्वात शक्तिशाली भू-चुंबकीय वादळाने युरोप आणि अमेरिकेत टेलिग्राफ नेटवर्क नष्ट केलं होतं. याशिवाय 1989 मध्ये कमी तीव्रतेचे सौर वादळ आले होते.
सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणाऱ्या वादळाला सौर वादळ असे म्हणतात. सूर्यावर दिसणारे डाग कालांतराने मोठे होतात. जेव्हा सौर डागांची संख्या वाढते तेव्हा सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं, मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते.
* अहवालात काय सांगितलंय वाचा
संगिता ज्योती यांनी मांडलेल्या संशोधनानुसार येणाऱ्या काळात सौर वादळामुळे इंटरनेट व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. इंटरनेट अनेक दिवस किंवा अनेक महिने ही बंद पडू शकते. महत्वाचे म्हणजे येणाऱ्या सौरवादळाचे पूर्वानुमान लावता येणं फार अवघड आहे. हे सौरवादळ पृथ्वीवर धडकणार आहे. याचे पूर्वानुमान जर लावायचे असेल तर ते केवळ एखादा दिवस आधी लावता येऊ शकते असेही त्यामध्ये सांगितले आहे.
इंटरनेटचे जाळे निर्माण करण्यासाठी समुद्रातून केबल टाकण्यात आलेल्या आहेत. जर 19 व्या शतकात ज्या क्षमतेचे सौर वादळ आले होते. त्याच क्षमतेचे सौर वादळ आता जर आले तर या सर्व केबल्स निकामी होऊ शकतात. परंतु इंटरनेट संबंधीच्या सुविधांचा विकास करण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साधने ही जास्त क्षमतेची नाहीत. त्यामुळे या येणाऱ्या सौरवादळात इंटरनेट संबंधीची सर्व साधने निकामी होऊ शकतात असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.