अमरावती : श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह बाहरे काढण्यात आले आहे. दशक्रियेच्या विधीसाठी हे सर्व आले होते. यानंतर महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने ते जात असताना अचानक नाव उलटली. दरम्यान घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप 3 मृतदेह मिळाले आहेत. 11 जणांमध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे. मोर्शीवरून मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
बुडालेले सर्वजण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते अशी माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु केला आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जोरदार पाऊस असल्याने अद्याप आठ जणांचा शोध लागलेला नाही. जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आज वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. त्याचवेळी अचानक नाव उलटली.
प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. मात्र, नियतीच्या मनात काय होते कोणास ठावूक. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले.
यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे. थोड्याचवेळात बचाव पथक दाखल होणार आहे.