मोहोळ : आईला मिळालेल्या जमिनीवरती वारसाहक्काने एकुलत्या एक मुलाची नोंद असताना त्याच्या चुलत भावाने गावकामगार तलाठी मंडळ अधिकारी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांना हाताशी धरून मयताचे बोगस फोटो, खोट्या सह्या करून त्या जमिनी या इतरांची नोंद लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मोठ मोठ्या पदावर असलेल्या तब्बल १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने मोहोळमध्ये खळबळ माजली आहे.
या प्रकरणी १३ जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील ढोक बाभळगाव येथे घडली. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास मनोहर बेले राव यांची आजी ब अफ्रुका लक्ष्मण बेलेराव हिला शासनाकडून जमीन मिळाली होती. अफ्रुका बेलेराव याच्या मृत्यूनंतर सदर जमिनीवरती अफ्रुका यांचा नातू देवीदास मनोहर बेलेराव यांचे नाव लागले होते, असे असताना देविदास बेले राव यांचे चुलत भाऊ विकास बेलेराव याने १ जुलै २०२१ रोजी त्या जमीनी वर आम्हा भावांची नावे लावावीत म्हणून अर्ज केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्या अर्जानुसार ढोक बाभळगावच्या तलाठ्याने बोगस नोटिसा काढल्या तसेच फिर्यादीची आज्जी अफ्रुका ही सोलापूर येथे मयत झाली असताना ती ढोकबाभळ गाव येथे मयत झाल्याचा खोटा दाखला ग्रामसेवकाकडून घेतला. याबरोबरच बाभळगावचे सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल यांना हाताशी धरून खोट्या सह्या व बोगस दाखले घेवून त्या जमिनी वरती फिर्यादी एकटा वारस असता ना इतर सातजणांची नावे वारसदार म्हणून नोंद केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी देविदास बेलेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ढोक बाभळगावचा कामती विभागाचा मंडल अधिकारी सुनिल केरबा बेलभंडारे, ढोक बाभळगावचा तलाठी सिद्धेश्वर हरीविजय नकाते, ग्राम सेवक मिलिंद कृष्णाजी तांबीले, महिला सरपंच रुक्मिणी राजाराम पांढरे, कोतवाल राजेंद्र जालिंदर कुंभार यांच्या सह माजी सरपंच बंडू शंकर मुळे, विकास गंगाराम बेलेराव, तानाजी दशरथ बेलेराव, सरूबाई शिवाजी बेलेराव, रुक्मिणी सतीश माने, जनाबाई गगाराम बेलेराव , जनार्धन गंगाराम बेलेराव , संगीता शिवाजी सुरवशे या १३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर खर्गे हे करित आहेत