मुंबई : किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ठाणे स्टेशनमध्ये पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांची रेल्वे स्टेशनमध्ये गर्दी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कोल्हापूरमध्ये जाऊन किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. मात्र ही पोलीस तक्रार होऊ नये यासाठी मला अडवलं जात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या हे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी कोल्हापुरात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली होती. मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून सोमय्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना मनाई करण्यात आल्याचे नोटीसीत म्हटले आहे, असे सोमय्या म्हणाले.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. दरम्यान सोमय्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापुरात न येण्याची नोटीस बजावली आहे. यावर सोमय्या चांगलेच संतापले आहेत. मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढल्यामुळेच ठाकरे सरकारने माझ्या अटकेचे आदेश दिले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ सोबत शेअर केला आहे. ते म्हणाले की, ‘ठाकरे सरकारची दडपशाही, माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश. मी मुलुंड निलम नगरहून ५.३० ला निघणार, आधी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे, असे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली होती. किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पहायला मिळाले. या सर्व आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप तसेच किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच किरीट सोममय्या यांना कोणतीही इजा किंवा त्रास होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे, असे मिटकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोमय्या यांनी घरीच थांबाव, अन्यथा महागात पडू शकतं असा सूचक इशाराही मिटकरी यांनी दिला होता.
किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांना त्यांना अडवलं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली. महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी आहे, मग मला मुंबईत का अडवलं जात आहे. कोल्हापूरच्या सीमेवर मला अडवलं पाहिजे. हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मला चार तास घरात डांबून का ठेवलं? असा प्रतिसवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.