कराड : मंत्री हसन मुश्रीफ यांचा गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप करीत ठाकरे सरकारने इतिहास रचला, घोटाळेबाजांऐवजी घोटाळे समोर आणणाऱ्यांना अटक करतंय असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच गडहिंग्लज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार असल्याचेही सांगितले.
माजी खासदार, भाजप नेते किरीट सोमय्या कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. तिथेच त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी शरद पवार, ठाकरे सरकारवर हल्ला करीत आरोप केले आहेत. गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळ बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापुरला जात असताना त्यांना कराडमध्ये पोलिसांनी रोखलं आहे. त्यानंतर आता सोमय्या यांनी ट्विट केलं. ‘पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडला थांबवले आहे. 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं’, असं त्यांनी ट्विट करुन सांगितले होते. त्या प्रमाणे तिसरा घोटाळा निदर्शनास आणला आहे.
किरीट सोमय्यांच्या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. हसन मुश्रीफ आज सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हसन मुश्रीफ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडतील. हसन मुश्रीफ सध्या मुंबईत असल्याचं सांगण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या त्याच कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला तसंच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
* मुश्रीफांच्या जावयावर घोटाळ्याचा आरोप
२०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिल्डींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीचे आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केल्याचा आरोप केला.
* मुश्रीफांचा तिसरा घोटाळा
आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले. गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी परिषदेत सांगितलंय.
* सोमय्यांना किठकिठाणी रोखण्याचा प्रयत्न
ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, मुंबई स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला असं सांगितलं. आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रोखण्याचा मला ठाकरे सरकारने प्रयत्न केला. मी आदेशाची कॉपी मागितली, त्यात लिहिलं होतं, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला, त्यावर पोलीस पळून गेले.
* चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी
माझी मागणी गृहमंत्री वळसेपाटीलांकडे ज्या पोलिसांनी गैर कायदेशीरपद्धतीने ऑर्डर दाखवली, कोल्हापूर पोलिसांची ऑर्डर, कराड पोलिसांनी दिली, या ऑर्डरमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका असं कुठेच नाही. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी स्वीकारणार का? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का?आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा, मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी.
* ठाकरे सरकारने सुरक्षा काढली, मोदी सरकारने सुरक्षा दिली
ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलं, तर माननीय हसन मुश्रीफ हे कागलमध्ये येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी जनसमुदाय दाखल होणार आहे, त्यावेळी किरीट सोमय्या गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची धारणा निर्माण आहे. माझी वळसे पाटलांकडे मागणी आहे, ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे, तर ही गुपीत माहिती कुठून दिली? ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं, त्याच्याशीही तुमची गद्दारी. तुमच्याकडे जी माहिती आली गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो, ही माहिती तुम्ही सुरक्षा यंत्रणांशी का शेअर केली नाही?