सोलापूर : जागा विक्रीचे पैसे न देता परस्पर प्लॉट विक्री करून पैसे घेतल्याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांसह आज तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ इमामसाब नदाफ (वय ४२ राहणार न्यु पाच्छा पेठ सिव्हील चौक), नगरसेवक रियाज (इब्राहिम हुंडेकरी वय ५५. व्यवसाय व्यापार राहणार न्यु ति-हे,गाव फॉरेस्ट सोलापुर), अब्दुल मतीन अ. रीफ हकिम (वय ३८, राहणार सिध्देश्वर पेठ, सोलापूर )असे तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
२० सप्टेंबर रोजी सय्यद फजलुल्ला कलीमुल्ला खतीब (वय ६९ वर्षे, व्यवसाय शेती, उत्तर कसबा, बाबा कादरी मस्जीद समोर, सोलापुर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यात हकिकत अशी की, आराफत इन्फ्रास्ट्रक्चर चे भागीदार आरोपी आरिफ इमामसाब नदाफ व अब्दुल मतीन अ. रीफ हकिम यांनी डेवलपमेंट अॅग्रीमेंट नुसार फिर्यादीचे व भावाचे नावे असलेली सोलापुर महानगर पालीकेच्या नवीन हद्दवाढीतील डी व सब डी तालुका उत्तर सोलापुर पैकी १. जुना सर्वे नं १४९/१ अ.नवीन सर्वे नं १४७/१ अ क्षेत्र एक हेक्टर ५० आर.२. जुना सर्वे नं १५०/१ व/२अ नवीन सर्वे नं १४८/१६/२अ क्षेत्र ०.८१ आर या जागे मधील प्लॉट नं ४.५.६.११.१२. क्षेत्र ३६४६.९ चौ मी ही जागा विकसीत न करता करार पत्राचा मंग करुन व करारानुसार ठरलेली रक्कम न न देता फसवण्याच्या उद्देशाने बँकेत पेस नसताना धनादेश देवून फसवणुक केली आहे.
फिर्यादीने करुन दिलेल्या कुल मूखत्यार पत्राचा गैरवापर करून सदर मिळकत ही परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने हुतात्मा नगरी या नावाने ब्राउशर काढले व त्यातील काही प्लॅटच्या बुकिंग करीता लोकांकडुन परस्पर पैसे घेतले आहेत असे समजले आहे, तसेच नमुद मिळकत विकसीत करण्याऐवजी या ठिकाणी विकास कामाला अडथळा येईल असे कृत्य करून शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, फिर्यादीचा विश्वास घात करून फसवणुक केली आहे हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून फौजदार शिंदे हे तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ड्रेनेज लाईनचे काम करताना मजूर ठार
सोलापूर – ड्रेनेज लाईनचे काम करताना अंगावर मातीचे ढीग पडल्याने मजूर जखमी होऊन मरण पावला. ही घटना बाळे येथील लक्ष्मीनगरात काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली .
आकाश तुकाराम पवार (वय २५रा.गांधीनगर दुधनी ता.अक्कलकोट) असे मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. तो काल सायंकाळी लक्ष्मी नगर (बाळे) येथे ड्रेनेज लाईनचे काम करत होता. त्यावेळी अंगावर माती ढासळल्याने तो जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मरण पावला. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीसात झाली. हवालदार कसबे पुढील तपास करीत आहेत .
* सिन्नुर येथे आत्महत्येचा प्रयत्न
सिन्नर तालुका अक्कलकोट येथे राहणाऱ्या मडीप्पा यशवंत व्हरकरी (वय४५) याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून शांतप्पा व्हरकरी (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले. तालुका पोलिसात याची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही.
* कर्जास कंटाळून विष प्राशन
धानोरे ( ता.माळशिरस) येथे राहणाऱ्या दामोदर पांडुरंग देवकाते (वय४५) याने खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काल सोमवारी रात्री च्या सुमारास त्याने वेळापूर येथे हा प्रकार केला होता .त्याला अकलूज येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची प्राथमिक नोंद झाली आहे.