सोलापूर : हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या युवक खेळाडूचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एक पैलवान व धावपटू म्हणून नावारूपास येऊ लागलेला बंडू आकस्मात गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. करमाळ्यातील सुपनवर वस्ती येथे शोककळा पसरली असून सर्वच परिवारातून दुःख व्यक्त केले जात आहे.
करमाळा श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबच्या वतीने हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी बंडू दत्तात्रय वाघमोडे (वय 21) याचे महक (जि. रोहतक, हरियाणा) येथे ता. 19 धावण्याच्या स्पर्धेदरम्यान आकस्मात निधन झाले आहे. करमाळा तालुक्यातून दहा युवक या स्पर्धेला गेले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा मृतदेह करमाळा येथे आणून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना समजल्यानंतर प्रशिक्षक दिनेश जाधव तसेच बंडू वाघमोडेचे बंधू नामदेव वाघमोडे व अशोक वाघमोडे हे हरियाना येथे जावून त्यांनी पार्थिव सोलापूरला आणले.
बंडू वाघमोडे यांचा भाऊ नामदेव वाघमोडे, अशोक वाघमोडे, पोथऱ्याचे शिंदे व अकॅडमीचे संचालक दिनेश जाधव हे हरियाना येथे गेले. शवचिकित्सा झाल्यानंतर व सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यावर सोलापूरला पाठवण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाघमोडे परिवार मुळचा निलज येथील रहिवाशी आहेत. ते अलिकडे सुपनवर वस्तीवरती राहत आहेत. दत्तात्रय वाघमोडे हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. नामदेव हा जेसीबी ऑपरेटर असून बंडू हा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्दित्तीय वर्षाला आहे. येथील दिनेश जाधव यांच्या श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबमध्ये बंडू वाघमोडे सराव करत होता. बंडू यास पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती व तो त्याची तयारी करत होता. हरियाना येथील महक (जि. रोहतक) येथे 19 सप्टेंबर पासून आंतरराज्य स्पर्धा सुरू झाल्या आहेत.
करमाळा तालुक्यातून दहा युवक या स्पर्धेला गेलेले आहेत. त्यापैकी पहिल्याच दिवशीच बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना तो कोसळला व त्याचा मृत्यू झाला. ही हकीकत घरी समजल्यानंतर वाघमोडे परिवारात दुख व्यक्त होत आहे. सोलापूरच्या खेळाडूचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पण त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही.