सांगोला : सांगोला तालुक्यातील धायटी येथील गोविंद नारायण पाटील यांच्या शेततळ्यात पाय घसरून पडून नवरा बायकोचा मृत्यू झाल्याने धायटी गावावर शोककळा पसरली आहे. यात पत्नी तळ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचाही मृत्यू झाला आहे. पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
गोविंद नारायण पाटील यांच्या गट नंबर 504 या गटात शेततळे असून शीतल मल्हारी पुजारी (वय 22) ही साईपनचा पाईप नीट करत असताना पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तिचा पती मल्हारी बाळू पुजारी (वय 30) गेला असता दोघांचा या तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची खबर येथील पोलीस पाटील प्रवीण गायकवाड यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* बोरामणीत अनोळखी महिलेचा गळा दाबून खून
सोलापूर – एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी विवाहितेचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून देण्यात आला. ही घटना बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील विमानतळालगत असलेल्या बंदेनवाज दर्ग्याजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
बोरामणी विमानतळाच्या बांधालगत एका चारीमध्ये ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. सोलापूर तालुका पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे पोस्टमार्टम केले असता त्यामध्ये तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा पोलिसांनी यासंदर्भात अनोळखी इसमा विरुद्ध खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मयत अनोळखी महिला ३० ते३५ वर्षाची असून तिच्या अंगावर गुलाबी परकर आणि जांभळ्या रंगाचा ब्लाऊज आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र देखील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास संपागे हे करीत आहेत.