नवी दिल्ली : यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) 2020 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी 761 विद्यार्थ्यांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनामुळे मुलाखत प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे निकालालाही उशीर झाला. युपीएससीमध्ये शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.
परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. या वर्षी 761 विद्यार्थ्यांची नियुक्तसाठी शिफारस करण्यात आली आहे. युपीएससीमध्ये शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ही युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जानेवारी 2021 मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मुलाखती झाल्या होत्या. यातून 263 जनरल,
86 ईडब्ल्यूएस, 229 ओबीसी, 122 एससी, 61 एसटी अशी वर्गवारी आहे.
असे एकूण 761 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302, ब गटातील प्रशासकीय सेवा 118 असे उत्तीर्ण झाले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते उत्तीर्ण झाले आहेत.