मंगळवेढा : वाळूची गाडी थांबवताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या टेम्पोने पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच चिरडले. यात त्या पोलीसाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे. गणेश प्रभू सोनलकर ( वय 32) असे मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही धक्कादायक, दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास गोनेवाडी-शिरशी (ता मंगळवेढा) रोडवर घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकअदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. बघ्याची गर्दी जमा झाली होती. जो- तो असे कसे घडले अशी विचारणा एकमेकांशी करु लागला.
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या माफियावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. कमी कष्टाच्या वाळू व्यवयासातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर ह्या वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याचवेळी समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला संशय आल्याने हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाळू माफियांवर अशा कारवाईसाठी गेलेल्या प्रशासकीय कर्मचारी आणि पोलिसांवर वारंवार असे हल्ले घडले आहेत, त्याची आज पुनरावृत्ती झाली. मंगळवेढ्यातील गोणेवाडी येथे वाळू चोरी सुरु असल्याची खबर त्यांना मिळाली होती, अशीही माहिती समोर येत आहे. त्यानुसार, कारवाईसाठी गेल्यानंतर घटनास्थळी मुजोर वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली, या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यात अद्याप वाळूचे कुठलेही लिलाव झाले नाहीत. त्यामुळं रोजचं येथील भीमा नदीच्या पात्रात राजरोसपणे बेकायदा पद्धतीनं वाळू उपसा सुरु होत आहे. पोलीस, महसूल कर्मचारी यांच्या अंगावर थेट गाडी घालण्याच्या प्रकारात वाढ होत आहेत.
या घटनेची फिर्याद गोणेवाडीचे पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी दिली आहे. त्यानुसार गाडीचा मालक, चालक आणि त्याचा साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मंगळवेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. पिंगळे यांनी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी कष्टाच्या या धंद्यातून मिळणाऱ्या पैशाच्या मस्तीमुळे वाळूतस्करांकडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक या धंद्यात उतरले आहेत. अनेकदा कारवाईसाठी गेलेले तलाठी, पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी यांना धमकाविण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
* मुलीचा विनयभंग तरुणावर गुन्हा
सोलापूर : एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनोद काशिनाथ राठोड (वय २८ रा. कल्याण नगर भाग३) याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल केला. हा प्रकार बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजापूर नाका परिसरात घडला होता. फौजदार मस्के पुढील तपास करीत आहेत.