भंडारकवठे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोरदारपणे मारहाण करून तिला जीवे ठार मारल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे आज शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता घडली आहे. त्याने हे सर्व रागाच्या भरात केले पण अपराध केल्याचे लक्षात येताच तो सावध झाला. त्यानेच मेहूण्याला फोन करुन आपल्या हातून घात झाल्याचे सांगितले.
मनीषा सिद्धू हराळे (वय ३६) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मयत मनीषा हिचा विवाह २००४ साली हराळवाडी ( ता. मोहोळ) येथील सिध्दू किसन हराळे यांच्याबरोबर झाला होता. सिद्धू हराळे यांची शेती गुंजेगाव येथे असल्याने ते आपल्या दोन मुली आणि एक मुलगा व पत्नीसह येथील बंडगर वस्ती गुंजेगाव येथे राहत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिद्धू हराळे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तू दुस-याच्या शेतात कामास का जाते म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून मनिषाला दमदाटी व शिवीगाळ करीत होता. आज शनिवारी दुपारी सव्वा बारा ते साडेबारा दरम्यान भांडण काढून तिच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. यात ती गंभीर जखमी होऊन हिचा जागेवरच मृत्यु झाला.
त्यानंतर पावणे एक वाजता सिद्धू हराळे यांनी आपल्या मेव्हणा खंडू माने याला फोन करून माझ्या हातून घात झाला आहे, मी तुझ्या बहिणीला जीवे ठार मारले आहे, असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच मेव्हणा खंडू माने व त्याचे कुटुंबीय गुंजेगाव येथे घटनास्थळी आले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, हवालदार शहानूर मुलाणी, श्रीकांत बुरजे, महेश कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी मंद्रूप ग्रामीण रूग्णालयास पाठविले. पती सिध्दू हराळे याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे हे करीत आहेत.
वाघोली येथील शेतकऱ्याचा मुलगा सागर मिसाळ झाला IAS अधिकारी
माळीनगर – वाघोली (ता माळशिरस) येथील श्री भारत जालिंदर मिसाळ या शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ UPSC च्या परीक्षेत पास होऊन यश संपादन केले आहे.
या पूर्वी २०२० मध्ये सागर भारत मिसाळ यांनी UPSC च्या परीक्षेत यश मिळवून उत्तराखंड या राज्यात IAS पदावर त्यांची निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनी बाळगून सागर मिसाळ यांनी हा दुसरा प्रयत्न केला होता त्यातही यश प्राप्त केले. या यशा बद्दल सागर मिसाळ यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.
सागर मिसाळ हे एक गरीब शेतकरी कुटुंबातील असून थोड्या फार शेतीत आई वडिलांनी कष्ट करून सागर मिसाळ व त्याच्या लहान भावाला शिक्षण दिले. भारत मिसाळ यांचा दुसरा मुलगाही UPSC चा अभ्यास करीत आहे. सागर मिसाळ यांचे प्राथमिक शिक्षण वाघोली (ता माळशिरस) येथील जिल्हा परिषद शाळेत होऊन माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले. कृषी पदवी घेऊन UPSC अभ्यास करीत होते.