अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी मैंदर्गी मधील प्रेमप्रकरणातील एका तरुणाचं आणि तरुणीच लग्न शुक्रवारी ( दि. २४) राञी १०. ३५ वा. मुहूर्तावर लग्न लावून देत कन्यादान देखील केले आहे. यामुळे पोलिसांच्या या पुढाकारामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
वेदमूर्ती धानय्या स्वामी यांच्या विविध मंञोपचाराने विधीवत लग्न लावण्यात आले.शेवटी लाडू वाटप करण्यात आले. काळे यांनी मणी मंगळसूञ, साडी, मुलास पूर्ण आहेर,भांडी स्वखर्चाने खरेदी करून मुलीस स्वतःची मुलगी मानुन लग्न केले.प्रत्येक ठिकाणी कायद्याने शिक्षा न करता सकारात्मक विचारसरणीने एकाचे कुंटुंब उभे राहत असेल तर ते नक्कीच चांगले आहे.
गेल्या सात आठ महिन्यापासुन मिस्त्री काम करणारा सचिन मंजुळकर यांची त्याच गावातील बिगारी काम करणाऱ्या यलव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पण मुलाच्या घरचे आंतरजाती मुळे लग्नास तयार नव्हते .मुलीचे आईवडिल सहा वर्षापूर्वीच वारले आहेत. ती आजीसोबत राहते.आजी पण वार्धक्याने घरीच असते.त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालविते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रेम करणारा सचिन वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करीत होता. गांवक-यांकडून न्याय मिळत नसल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपली आपबीती पोलीस निरीक्षकांना सांगितले. पोलीस निरीक्षक यांनी मुलाला व नातेवाईक मामा यांना बोलावुन घेतले. समुपदेशन करून स्वतः पोलीस निरीक्षक यांनी कन्यादान करून लग्न लावुन दिले.लग्नाला दोन्ही बाजूने पाहुणे हे पोलिस होते. आपल्या मुलीचे कन्यादान करण्याचे प्रत्येक वडीलांचे स्वप्न असते, हे भाग्य पोलिसांना लाभले आहे. या समाजाभिमुख कार्याबद्दल पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रदीप काळे व सहका-यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड, फौजदार प्रवीण लोकरे, सुरेश जाधव,अजय भोसले, संजय पांढरे, सुनिल माने, एजाज मुल्ला, अमोघसिद्ध वाघमोडे, केदारनाथ सुतार, महादेव शिंदे, महिला पोलीस चमेली राजमाने, जोस्ना सोनकांबळे व अनेक नागरिक उपस्थित होते.
* एसटी आणि ट्रकचा अपघात , ट्रक चालक आणि ५ प्रवासी जखमी