सोलापूर : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड औरंगाबादचे आज रविवारी सोलापुरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सात रस्ता शासकीय विश्रामगृहात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यात सोलापुरात लवकरच अक्कलकोट रोडवर औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच होणार असल्याची घोषणा झाली.
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी एम डी शेख यांनी मांडली. कार्यशाळेस औरंगाबाद वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रादेशिक वक्फ अधिकारी पुणे विभाग व इतर कर्मचारी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कार्यशाळेत नवीन अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे, बदल अर्ज ( चेंज रिपोर्ट ) सादर करणे , तयार असणाऱ्या प्रमाणपत्रांचे वितरण करणे, स्कीम मंजुरीतील कागदपत्रांची पूर्तता करणेसह वक्फ नोंदणीचे तसेच वक्फ संबंधी विविध माहिती देऊन कामे केली गेली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मस्जिद, मदरसे, दर्गाह, कब्रस्तान विषयी सर्व मिळून 30 प्रकरणे दाखल करण्यात आले.
यावेळी अनिस शेख यांनी सोलापुरात अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्थानमधील जागेत औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच उभारण्यात येईल अशी, ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यशाळेत सकाळपासून सायंकाळपर्यंत एक हजारावर नागरिकांनी आपली प्रकरणे घेऊन या ठिकाणी भेट दिली.
कार्यशाळेचे आयोजन ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष एम. डी. शेख यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारुख पठान, कायदा सल्लागार उबेद पटेल, प्रादेशिक अधिकारी पुणे खुसरो खान, तोफिक भाई शेख , इरफान भाई शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गौस शेख , तमजीत गोगी, सिकंदर नदाफ, कादर हिप्पर्गी, बंदेनवाज रामजाने, असलम शेख, रियाज शेख, डॉ . विजयकुमार माचले आदींनी परिश्रम घेतले .