नवी दिल्ली : मासिक पाळीबाबत अजूनही तरुण मुलींना पाहिजे तितकी माहिती मिळत नाही. ही समस्या लक्षात घेत गुजरातच्या अहमदाबाद येथील 11 वर्षीय आयशा गोयलने खास अॅप तयार केले आहे. आयशाने आपल्या मैत्रिणींना या समस्येतून जाताना पाहिले व त्यानंतर Free Flo नावाचे एक अॅप तयार केले आहे. हे अॅप वापरण्यास सोपे व मासिक पाळीबाबत संपूर्ण माहिती देते. अॅपद्वारे मॅन्सट्रूएशन सायकलला ट्रॅक देखील करता येईल.
मासिक पाळी Menstrual cycle बद्दल आपल्याकडे 21 व्या शतकात अजूनही खुलेपणाने बोलले जात नाही, मात्र याबाबत आपल्याकडे आधीपासूनच अनेक गैरसमज पसरले आहेत. मासिक पाळीत अल्पवयीन मुलींना नेमका काय त्रास होतो याविषयी देखील अनेक कुटूंबांमध्ये मुली घरच्यांसोबत खुलेपणाने बोलू शकत नाहीत.
महिन्यातील मासिक पाळीच्या चार पाच दिवसांत मुली-स्त्रियांनी शारिरिक त्रास होत असतोच मात्र आपल्याकडील रुढी परंपरांमुळे त्यांना मानसिक तणावात देखील रहावे लागते. यासाठी मासिक पाळीच्या दिवसांत मुलींच्या शरीरात नेमके काय बदल होतात याची माहिती पोहचवणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबाद येथील ‘White hat jr’ची विद्यार्थिनी असलेल्या अकरा वर्षीय आयेशा गोयलने एक खास अॅप तयार केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयेशाने तिच्या अनेक मैत्रिणींशी मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाबद्दल संवाद साधला. त्यानंतर तिने यासाठी Free Flo नावाचे एक अॅप तयार केले आहे. हे अॅप वापरण्यासही अगदी सोपे आहे, या अॅपद्वारे मॅन्सट्रूएशन सायकल देखील ट्रॅक करता येत असून हे अॅप मासिक पाळीबाबत संपूर्ण माहिती देते.
या अॅपबाबत बोलताना, आयेशा म्हणाली की, “तरुणींना मासिक पाळीबाबत बोलताना अनेकदा समस्येचा सामना करावा लागतो. याबाबत जाणून घेण्यासाठी तरुणींकडे खूपच कमी विश्वसनीय प्रौढ व्यक्ती असतात. मला मैत्रिणींना त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत माहिती मिळवण्यास व समजण्यास अडचण येत असल्याचे मला जाणवले. येथूनच मला अॅप तयार करण्याची कल्पना सुचली. एक असे अॅप जे मासिक पाळीबाबत तर संपूर्ण माहिती देईलच पण सोबतच याच्याशी संबंधित समस्या जसे की, पाठदुखी, पुरळ तसेच ट्रॅकिंग पीरियड स्टेट्स आणि चॅट बॉट सारख्या सेवांचा समावेश केला असल्याचेही तिने सांगितले.
हे अॅप बनवताना आयेशाला पर्ना मेहता यांनी मार्गदर्शन केले आहे, “आयेशाने आपल्या मैत्रिणींच्या समस्येविषयी सहानुभूती व्यक्त केली व यावर मार्ग शोधला. यासाठी तिने खूप मेहनत घेतली. Free Flo एक सोपे अॅप आहे. येथून तरूणींना सहज माहिती मिळेल.
याबाबत बोलताना आयशाच्या आई शैलेजा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी त्या म्हणाल्या की, “एका मुलीची आई म्हणून मी समजू शकते की मासिक पाळी दरम्यान मुलींना कशाप्रकारच्या सपोर्टची गरज आहे. भारतातील प्रत्येक मुलगी आपल्या कुटुंब, मित्र-मैत्रिणींशी याबाबत बोलू शकेल एवढी नशीबवान नसते. आयेशाने बनवलेले अॅप हे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून बनवले आहे. येथून तरूणींना मासिक पाळीबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
“तरुणींना मासिक पाळीबाबत बोलताना अनेकदा समस्येचा सामना करावा लागतो. याबाबत जाणून घेण्यासाठी तरुणींकडे खूपच कमी व्यक्ती असतात. येथूनच मला Free Flo अॅप तयार करण्याची कल्पना सुचली”
– आयशा