सोलापूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयातील क्वार्टर गार्ड जवळ चक्कर येऊन पडल्याने विक्रम बलभीम ममलय्या ( वय३३ रा. पंढरपूर) हे प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी होऊन मरण पावले. ही घटना काल बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
विक्रम ममलय्या हे पाणी पिण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी चक्कर येऊन पडल्याने बेशुद्ध झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले. विक्रम यांचे वडील बलभिम हे पोलीस सेवेत असताना २०१४ साली मयत झाले होते. अनुकंपा तत्वावर ते मे महिन्यात पोलीस प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिसात झाली असून फौजदार बादोले पुढील तपास करीत आहेत.
* बाळे पुलाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील जिप कर्मचारी ठार
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* जेवताना ठसका लागल्याने मृत्यू
सोलापूर : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे जेवण करताना ठसका लागल्याने संजय भोजप्पा जडगे (वय४२) हे बेशुद्ध होऊन उपचारापूर्वी मयत झाले. आज बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते घरात जेवण करीत होते. त्यावेळी अचानक ठसका लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* गळा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : परमेश्वर पिंपरी (ता. मोहोळ) येथे आजारास कंटाळून अभिमान पांडुरंग घोडके (वय६०) यांनी पत्र्याच्या पट्टीने गळा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला जखम झाली होती त्याच्या त्रास सहन होत नसल्याने हे कृत्य केले. अशी नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.