जकार्ता : इंडोनेशियातील एक व्यक्ती चक्क प्रेशर कुकरच्याच प्रेमात पडला. त्यानंतर त्याने कुकरसोबत लग्न करून संसारही थाटला. आणि लग्नानंतर चार दिवसांतच कुकरसोबत घटस्फोटही घेतला. या विचित्र लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. खोइरुल अनाम असं त्या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या बायकोला फक्त भात शिजवता येतो, दुसरं काहीच नाही. या कारणामुळे त्याने कुकरला घटस्फोट दिला असल्याचे सांगितले.
खोइरुलने कुकरसोबत आपले काही आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ज्यात तो एका पांढऱ्या कुकरसोबत दिसतो आहे. हा पांढरा कुकर आपली बायको असल्याचं त्याने सांगितलं आहे. खोइरुल इंडोनेशियातील फेमस कंटेन्ट क्रिएटर आहे. फेसबुकवर त्याचं वेरिफाइड प्रोफाइल आहे. त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे आणि त्यावर बऱ्याच कमेंटचा वर्षाव होत आहे.
त्याने कुकरसोबत कायदेशीररित्या लग्न केलं. लग्नाच्या पेपर्सवर सही केली आणि कुकरला आपली बायको बनवलं. पांढऱ्या कुकरसोबत काही पोझ दिल्या आहेत. एका फोटोत तर त्याला किस करतानाही दिसतो. माझी नवरी सुंदर आहे, माझं सर्वकाही ऐकतं, काहीच बोलत नाही आणि जेवणही बनवते, म्हणून त्याने कुकरसोबत लग्न केल्याचं सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये तर अनाम कुकुरला चक्क किस करताना दिसतोय. पण कुकुरसबोत लग्न करुन तो एवढ्यावर थांबलेला नाही. त्याने आपल्या पत्नीला पुढच्या चारच दिवसात घटस्फोटदेखील दिला आहे. घटस्फोट देण्याचे कारण अगदीच चक्रावून सोडणारं आहे.
खोइरुलच्या या लग्नाचे फोटो पाहूनच सर्वांना धक्का बसला आहे. पण त्यानंतर तर त्याने आणखी मोठा धक्का दिला. कुकरसोबत लग्न करून 4 दिवसांतच त्याने त्याच्यासोबच घटस्फोटही घेतला. याचं कारणही त्याने विचित्र दिलं आहे. त्याने लग्नाप्रमाणेच घटस्फोटाची घोषणाही सर्वांसमोर केली. आपल्या बायकोला फक्त भात शिजवता येतो, दुसरं काहीच नाही असं तो म्हणाला आणि घटस्फोट दिला.
त्याने आपल्या पत्नीला म्हणजेच प्रेशर कुकुरला घटस्फोट देण्याचं कारणही तसंच विशेष आहे. माझ्या पत्नीला फक्त भात तयार करता येतो, त्यामुळे मी घटस्फोट घेतोय असं कारण या तरुणाने दिलेलं आहे. मुळात खोइरुल अनाम हा तरुण एक कंन्टेंट क्रिएटर आहे. त्याचे फेसबुकवरील अकाऊंट व्हेरिफाय केलेलं असून त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या या लग्नाच्या पोस्टला आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं आहे. तर हजारो लोकांनी या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.