अहमदनगर : विकासात रस्ते महत्वाचे असून नितीन गडकरी यांच्या कामामुळे विकासाला गती मिळत आहे. तसेच गडकरींच्या कारकिर्दीत रस्ते दुपट्टीने वाढले. जगभरातील रस्त्याचा तोंडभरून कौतुक केलं. यावेळी मात्र गडकरी यांनी एका गोष्टीची लाज वाटत असल्याची स्पष्टच कबुलीच दिली. कोणती लाज वाचा पुढे…
अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज पवार आणि गडकरी एकाच मंचावर होते. नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार 46 कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. देशाच्या कोणत्याही भागात गेल्यावर चांगले रस्ते पहायला मिळतात. तिथं लोकं सांगतात ही गडकरी यांची कृपा आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी गडकरींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. गडकरी विकास कामे करताना राजकारण पहात नाहीत. मागणी काय आहे ते पाहतात यामुळं सर्वपक्षीयांची कामे होतात. मी रस्त्याने प्रवास करतो तेव्हा मला लोक हि गडकरीची कृपा असल्याचं सांगतात.
जिल्ह्यातील अभ्यास करून गडकरींनी देशात महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन व आधुनिक रस्ते तयार केले असं लोकार्पण आज झालं. यावेळी केंद्रिय सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मंत्री नितीन गडकरी शरद पवार शरद पवार यांनी गडकरींच्या कामाचं यांच्यासह राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आज एकाच व्यासपीठावर होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार म्हणाले की, साखर आव्हानात्मक परिस्थिती लवकर येईल असं मला वाटते. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं. आधार देणार पीक ऊस आहे. पुढील दोन वर्षे भूगर्भातील पाणी चांगलं राहिल त्यामुळे एकच पीक शेतकरी घेतील. त्यामुळे उसातून साखर एके साखर हे कमी करावे लागेल इथेनॉलकडे जावं लागेल. हायड्रोजन गॅस हे इथेनॉलच्या पुढची स्टेप आहे, असंही पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, रस्ते वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्वाची असते. गडकरी यांनी जबाबदारी घेण्यापूर्वी 5 हजार किमी रस्ते होते ते आता 12 हजार किमीच्या पुढे गेले आहेत. संसदेमध्ये गडकरी आलेला व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहेत ते पाहात नाहीत विकास कामं पाहतात, असं शरद पवार म्हणाले. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो, असं शरद पवार यावेळी म्हणाले. लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे, असं देखील शरद पवार म्हणाले.
दरम्यान, नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असं शरद पवार म्हणतात. “संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
* गडकरी म्हणाले याची आम्हाला लाज वाटते
पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दूग्धोत्पादनाचं यावेळी गडकरींनी कौतुक केलं. एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जितकं दूध संकलित होतं, तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी त्यांनी दूध उत्पादनाबाबतचा एक किस्सा सांगितला. ‘एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरीच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे ३ लाख लिटर दूध संकलित होतं, ते १० लाख लिटर कसं होईल? त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला.
एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध संकलित होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते. आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. त्यामुळे तो आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.