सोलापूर : निर्घृणपणे खुन करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रमजान शेख सह दोघांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी तीन हजार दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. यात पतीने निर्दयीपणे पत्नीचा खून केला होता.
पती रमाजन मनू शेख (वय-२२ वर्षे), त्याची आई अम्मा ऊर्फ रेणूका मन्नू शेख आणि शेजारी राहणारी शाहीन रहीमान शेख,( वय ३० वर्षे) या तिघांना जन्मठेप तर दिलदार तकदीरखाँ सौदागर, (वय ३५ वर्षे सर्व रा. घाडगे दुध डेअरी समोर, संजय नगर झोपडपटटी, अक्कलकोट) यास पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अक्कलकोट येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शहनाज रमजान शेख (वय ३०) हिचा खून केल्याच्या आरोपावरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी काल पती व सासूसह चौघांना दोषी धरले होते. शिक्षेची सुनावणी आज मंगळवारी होणार होती. त्यानुसार आज सुनावणी झाली.
पती रमजान मन्नू शेख (वय २२), सासू अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, शाहीन रहेमान शेख (सर्व रा. संजयनगर झोपडपट्टी, अक्कलकोट) यांना खूनप्रकरणी तर दिलदार तकदीरखाँ सौदागर (वय ३५, रा. अक्कलकोट) यास पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले. रमजान, अम्मा, शहनाज आणि शेजारील शाहीन शेख यांनी घटनेच्या नऊ महिने आधी अक्कलकोट येथील विकास हॉटेलजवळ शहनाज हिच्या पाच महिन्याच्या मुलीचा खून करून मृतदेह टाकून दिला होता. त्या प्रकरणावरून सर्व आरोपींमध्ये भांडणे सुरू झाली होती.
त्यावेळी रमजान, अम्मा, शाहीन या तिघांनी रमजानची पत्नी शहनाज हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने ती बेशुध्द पडली होती. त्यावेळी अम्मा हिने शेजारी राहणारा दिलदार याची रिक्षा भाड्याने आणली. त्यात शहनाज हिला बसवून तिला अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यासमोर अम्मा व शाहीन यांनी नेले. तर रमजान मोटारसायकलवरुन तेथे गेला. त्याठिकाणी दवाखान्याच्या मोकळ्या जागेत शहनाज हिला नेण्यात आले. रमजान याने हॅक्सा ब्लेडने पत्नी शहनाज हिचे मुंडके कापून धडावेगळे केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदरची घटना दिलदार याने पाहिली होती म्हणून त्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. एका पोत्यामध्ये शहनाज हिचे प्रेत आणि मुंडके एकत्र भरून ते दिलदार याच्या रिक्षाने अक्कलकोट एमएसईबी चौकात आणण्यात आले आणि तेथून ते रेल्वे अपघात दाखवण्यासाठी तोळणूर शिवारात रेल्वे रूळावर टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
याची प्रथम खबर रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये दिली. पोलीस शिपाई धनसिंग राठोड यांनी फिर्याद दिली. आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. रेल्वे अपघात दाखविण्यासाठी त्यांनी खटाटोप केला, परंतु पोलिस तपासात सत्य समोर आले. रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी मृताची खबर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर सरकारतर्फे पोलिस हवालदार धनसिंग राठोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी कसून तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात १७ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, आरोपींची कबुली, यावर सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना दोषी धरले आणि जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्ही. एस. जाधव यांनी केला तर कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार डी. कोळी यांनी काम पाहिले.