मुंबई : महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष यात सामील होणार आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला.
लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून पक्ष म्हणून महाविकास आघाडी 11 ऑक्टोबरला बंद करणार आहोत. आज मंत्रिमंडलाने देखील याबाबात खेद व्यक्त केला आणि हुतात्माने श्रद्धांजली वाहण्यात आले. भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील म्हणाले.
दरम्यान प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचं उद्यापासून देशभरात जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर हिंसाचारानंतर पीडित व्यक्तींच्या भेटीसाठी जाताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना आधी नजरकैदेत ठेवले होते. नंतर अटक करण्यात आली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत.’
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. 4 ऑक्टोबर 1977 ला त्यावेळेसच्या जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती होत आहे. प्रियंका गांधी यांना अटक करून भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेज जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार आहे. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत, असं पटोले म्हणाले.
देशात सध्या पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात देश पेटलेला पाहायला मिळत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावरून माघारी परतावं लागलं. त्यांनाही जाऊ दिलं नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरताना दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.