नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर ३ नेत्यांना लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाता येणार आहे, असे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी आज लखनऊ विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित आहेत. लखीमपूरमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला.
आज बुधवारी सकाळी राहुल गांधी, सचिन पायलट, चरणजीत सिंग चन्नी, भुपेश बघेल आणि के सी वेणुगोपाल लखीमपूर खेरीच्या दिशेने निघाले आहेत.
काल मंगळवारी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. दुसरीकडे, सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद मंगळवारीही उमटले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. दुसरीकडे, सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बेकायदा असून, ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस देण्यात आलेली नाही, असे प्रियंका यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारली आहे. या भेटीस परवानगी देण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी सांगितलं होतं. लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने जमावबंदीचं १४४ कलम लागू केलं आहे.
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले असून निषेध व्यक्त केला जात आहे.
* कारवाईच बेकायदा असल्याचा आरोप
मृतांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी लखीमपूर खेरीला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना रोखण्यात आले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना सोमवारी पहाटे ४.३० वाजता सीतापूर येथे विश्रामगृहात स्थानबद्ध करण्यात आले. प्रियंका यांच्यासह ११ जणांविरोधात मंगळवारी कलम १५१, १०७ आणि ११६ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुड्डा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आदींचा समावेश आहे. मात्र, या कारवाईबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस दिलेली नसून, वकिलांनाही भेटू दिले जात नसल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. ही कारवाईच बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी केला.
तत्पूर्वी, प्रियंका यांनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करणारी एक चित्रफीत प्रसृत केली होती. त्यात शेतकऱ्यांना मोटारीद्वारे चिरडण्यात येत असल्याची चित्रफीत दाखवत प्रियंका यांनी मंत्रिपुत्र मोकाट का, असा सवाल केला.