नागपूर : शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज CBI ने छापेमारी केली. CBIचे 7 अधिकारी आज सकाळीच देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. CBI कडे देशमुखांचे पुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट आहे. त्यामुळे देशमुखांच्या मुलाला आणि सूनेला अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
आज सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात अधिकारी घरी पोहोचले असून देशमुखांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सीबीआयचे अधिकारी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुखांच्या घरी पोहोचले. त्यांच्याकडे देशमुखांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट आहे. त्यामुळे देशमुखांच्या मुलाला आणि सूनेला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण, देशमुख कुटुंबीय कुठे आहे? याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी अनिल देशमुखांवर शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत. देशमुखांच्या घरी आतापर्यंत ईडीने सहावेळा, सीबीआयने तीनवेळा आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याने ते आणखीनच अडचणीत आले आहेत. तसेच वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापासून ते अज्ञात स्थळी आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, न्यायालयाने देखील त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र, अद्यापही अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? याचा थांगपत्ता लागलेला नाही. आता सीबीआयचे अधिकारी थेट त्यांच्या मुलाला आणि सूनेला अटक करण्यासाठी पोहोचल्याची माहिती आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेडचे काम करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.
देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये गोळा केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.
टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे अनेक आरोप परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.