मुंबई : ‘तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतं, मी आजही मुख्यमंत्रीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही,’ असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये बोलत होते. गेल्या 2 वर्षापासून मी जनतेच्या सेवेत आहे, त्यामुळे जनतेनेही मला कधी जाणवू दिलं नाही, की मुख्यमंत्री नाही, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.
‘मला एकही दिवस जाणवलं नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे.’, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही. तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिलं नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक देखील केली. म्हात्रे यांनी कोविड काळात अत्यंत चांगले काम केले आहे. तसेच त्या नेहमी गोरगरीबांच्या कामासाठी तत्पर असतात, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजपसोबत काडीमोड घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. पण, निवडणुकीच्या आधी सुद्धा आणि नंतरही देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन-मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका देखील झाली होती.
गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही फडणवीस म्हणाले.