मुंबई : राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी तसेच पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. जिरायतीसाठी 10 हजार रुपये – प्रति हेक्टर- बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर – बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर. – ही मदत 2 हेक्टर मर्यादेत.
नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.
राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेती आणि पिकांचं नुकसान बघून अनेक शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली. अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही विनंती राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
जिरायती शेतीसाठी 10 हजार, बागायती शेतीसाठी 15 हजार, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार आहे. सरकारद्वारे मिळणारी ही मदत 2 हेक्टर क्षेत्रफळापुरती मर्यादित असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागात पावसाचं प्रमाण अधिक झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. कोकणात अतिवृष्टी झाल्यानं चिपळूण, महाड भागात जनजीवन पार विस्कळीत झालं होतं. तर मराठवाड्यातील 38 लाख हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या सर्व नुकसानीसाठी राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 हजार कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल 55 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं होतं. राज्यभरातून शेतकरी मदतीसाठी आक्रोश करत होते.
विरोधी पक्षांनी राज्य सरकार मदत करत नसल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत जाहीर केली. ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. पण जवळपास दोन महिने झाले तरी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा होत नाही, असं म्हणत विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशाराच दिला होता.
शेतकऱ्यांचा दसरा अंधारात गेला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी थेट राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारला शेतकरी मदतीवरुन घेरलं होतं. दुसरीकडे राज्य सरकारकडून पंचनाम्याचं कारण दिलं जात होतं.