मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आरोपी महिला राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. राज ठाकरेंना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात, मुंबईत कसा राहतोस? असे प्रश्न ती विचारत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. राज ठाकरेंना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात, मुंबईत कसा राहतोस? असे सवाल करत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांचा समावेश आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. ही महिला आपल्या सहका-यांसोबत मढ येथील एका बंगल्यावर गेली होती. त्यावेळी संभाषणादरम्यान सुरक्षारक्षकाने राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं म्हटलं. यानंतर संतापलेल्या या महिलेने त्याला मारहाण केली. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याविषयी अधिक माहिती देताना मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षित म्हणाले, दयानंदा या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. 15 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक महिला रात्र असल्याने पोलीस ठाण्यात आली नाही. त्या महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे.
* बॉलिवूड कनेक्शन उघड
या टोळीचा पर्दाफाश झाला असून यात बॉलिवूड कनेक्शन उघड झाले आहे. अटक करणाऱ्यात आलेल्यांमध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलंकर यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस धाडली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. आरोपींनी मढ परिरातील एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकानं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.