सोलापूर : येथील तेलंगी पाच्छा पेठेत राहणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात अज्ञात चोरट्याने 98 हजाराच्या मुद्देमालाची चोरी केली. ही घटना सोमवारी घडली. दुस-या घटनेत पंढरपूर बसस्थानकावर महिला कंडक्टरला धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.
निजामोद्दीन चिारसाहब चितापुरे (वय 60, रा. तेलंगी पाच्छा पेठ रविंद्र बाग समोर सोलापूर) हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले असून ते त्यांच्या घरात पत्नी मुलांसह राहात आहेत. सकाळी उठून ते नेहमी प्रमाणे नमाजसाठी जात असताना घरात पत्नी व मुलांना घराचा दरवाजा लावून घ्या असे सांगितले त्यानंतर नमाजाला गेले.
नमाज पडून काही वेळाने ते घरी आले असताना पत्नी व मुले घरात झोपलेले होते त्यांनी घरातील कपाटाकडे पाहिले असता कपाटातील 90 हजाराची रोकड, एक रेडमी मोबाईल , एक मोबाईल असा एकूण 98 हजार 500 रूपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला अशी फिर्याद निजामोद्दीन चितापुरे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.
* महिला कंडक्टरला धक्काबुक्की
सोलापूर – तिकीट काढण्याचे आणि स्टॉपवर उतरण्याच्या कारणावरून महिला बस वाहकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना पंढरपूर बस स्थानकात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पंढरपूर शहर पोलिसांनी पूजा नरेश चव्हाण (रा. मेंढापूर) आणि स्वाती युवराज पवार राहणार (पंढरपूर)या दोघीवर व गुन्हा दाखल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या संदर्भात शामल नवनाथ पांचाळ (रा. पाटोदा जि. बीड) या बसवाहकाने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्या दोघी दुपारी आष्टी (मोहोळ) येथून बसमध्ये प्रवेश केल्या. तिकीटाच्या कारणावरून तक्रार झाल्याने दोघींनी तुला नोकरी करून देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर पंढरपूर बस स्थानकात त्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केला. अशी नोंद पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक वागाव पुढील तपास करीत आहेत.
* मार्डी येथील रुग्णालयाच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या