Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

प्रिसिजनच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे राज्य सरकारकडे सादरीकरण

Surajya Digital by Surajya Digital
October 19, 2021
in Hot News, Techनिक, सोलापूर
13
प्रिसिजनच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे राज्य सरकारकडे सादरीकरण
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मुंबईतील सह्याद्री शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, परिवहन सचिव आशिषकुमार सिंग, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे हे उपस्थित होते.

प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा व कार्यकारी संचालक करण शहा यांनी सर्वांना भारतातील पहिल्या मध्यम आकाराच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची सविस्तर माहिती दिली. या बसची फिल्मही दाखविण्यात आली. राज्य शासनाने प्रिसिजन समूहाच्या या बसचं व रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचं कौतुक केलं.

वाहतूकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने ही बस तयार केली आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी ही माहिती माध्यमांन दिली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रिसिजनने डिझेलवर चालणाऱ्या २३ आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये १८० किलोमीटर धावेल. प्रिसिजनची इलेक्ट्रिक व्हेईकल टीम वर्षभर या प्रोजेक्टवर पुणे येथे काम करत होती. यासाठी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) संस्थेने या बसचे टेस्टिंग करत प्रिसिजनला सहकार्य केले. या बसचे शासनासमोर सादरीकरण झाले आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. मात्र संपूर्ण नवे इलेक्ट्रिक वाहन बनविण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे ‘रेट्रोफिटिंग’ ही संकल्पना पुढे आली. यामध्ये वाहनाचे इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बसविली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी असणार आहे.

प्रिसिजनने मे २०१८ मध्ये नेदरलँड्समधील ‘इमॉस मोबील सिस्टिम्स बी. व्ही.’ ही इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन उत्पादक कंपनी संपादित केली. इमॉसमुळे प्रिसिजन समूहाकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनाचे इलेक्ट्रीफिकेशन करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. इमॉसने आतापर्यंत ६०० पेक्षाही अधिक जड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन केले आहे. त्यानंतर ही वाहने एकूण १६ कोटी किलोमीटर्सपेक्षाही अधिक अंतर यशस्वीरीत्या धावली आहेत, असेही करण शहा यांनी सांगितले.

Tags: #Presentation #Precision #Retrofitted #ElectricBus #Government#प्रिसिजन #रेट्रोफिटेड #इलेक्ट्रिकबस #राज्यसरकार #सादरीकरण
Previous Post

बेकायदा डिझेल निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीला अटक

Next Post

नमाजासाठी गेल्यावर निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, महिला कंडक्टरला धक्काबुक्की

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नमाजासाठी गेल्यावर निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, महिला कंडक्टरला धक्काबुक्की

नमाजासाठी गेल्यावर निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, महिला कंडक्टरला धक्काबुक्की

Comments 13

  1. Carolyn says:
    5 months ago

    I think this is among the most significant information for
    me. And i am glad reading your article. But should remark on few
    general things, The site style is wonderful, the articles is really great
    : D. Good job, cheers

  2. Alease says:
    5 months ago

    Excellent article! We will be linking to this particularly great article on oursite. Keep up the great writing.

  3. Elane says:
    5 months ago

    I enjoy reading through a post that can make people think.
    Also, thank you for allowing me to comment!

  4. Monroe says:
    5 months ago

    I think what you said made a great deal of sense. But,what about this? what if you added a little content?I mean, I don’t want to tell you how to run your website, howeverwhat if you added a title that makes people want more? I mean 「未知しるべ」– 中高年の癒しのLive on blog~オカダミノル is a little vanilla.You should peek at Yahoo’s front page and see how they create post headlines to grab viewers to click.You might add a video or a related pic or two to get readersexcited about what you’ve written. In myopinion, it might bring your website a little bit more interesting.

  5. Katelin Minato says:
    5 months ago

    Please check the list of group buy service available here: https://groupbuyserver.com

  6. Terra says:
    5 months ago

    I do not even understand how I ended up right here, but
    I believed this publish used to be great.
    I don’t recognise who you are but definitely you are
    going to a well-known blogger for those who are not already.
    Cheers!

  7. Hui says:
    5 months ago

    These are truly great ideas in about blogging. You have touched some fastidious factors here.Any way keep up wrinting.

  8. Annie says:
    5 months ago

    Your style is so unique in comparison to other folks I have
    read stuff from. Many thanks for posting when you have the opportunity, Guess I will just bookmark this site.

  9. Jerrod says:
    5 months ago

    Hello, this weekend is good in support of me, as this occasion i am reading this great educational
    post here at my residence.

  10. Dusty says:
    5 months ago

    Wow, wonderful blog structure! How lengthy have you been blogging for?you made blogging glance easy. The overalllook of your website is fantastic, let alone the content!

  11. Paulita says:
    5 months ago

    I think this is one of the most significant info for me.And i’m glad reading your article. But want to remark on few general things, The site styleis ideal, the articles is really great : D. Good job, cheers

  12. Scarlet Jerden says:
    4 months ago

    It is an incredibly amazing powerful resource that you’re offering and you simply provide it away cost-free!! I comparable to discovering websites which often understand the particular valuation on giving you fantastic learning resource for zero cost. We truly dearly loved examining this page. Love!

  13. hotshot bald cop says:
    4 months ago

    Hi there, this weekend is good for me, since this time i am reading this impressive educational post here at my house.|

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697