मुंबई : आर्यन खान ड्रग्स कनेक्शनमध्ये आज अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव समोर आले आहे. एनसीबीने आज अनन्याच्या घरी धाड टाकली. तिचा फोन, लॅपटॉप जप्त केल्याचेही वृत्त आहे. ड्रग्स प्रकरणात समोर आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्याचेही नाव समोर आले आहे. सध्या अनन्याची एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशी सुरू आहे. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात तिची चौकशी होण्याची शक्यता आहे.
तिचे वडील अभिनेता चंकी पांडेही तिच्यासोबत होते. एनसीबीने अनन्या पांडेची चौकशी करण्यासाठी प्रश्नांची यादी तयार केली आहे. एनसीबी विशेषत: व्हॉट्सअॅप चॅट संदर्भात अनन्याला प्रश्न विचारतील. आज एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आणि तिला चौकशीसाठी समन्स बजावले होते.
एनसीबीच्या टीमने गुरुवारी मुंबईतील अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. या दरम्यान, एजन्सीने अनन्याच्या घरातून फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. एनसीबीने या वस्तू त्यांच्यासोबत घेतल्या आहेत. आता ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची टीम अनन्याची चौकशी करेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनन्या पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. एनसीबी गुरुवारी शाहरुख खानचे घर ‘मन्नत’वर पोहचली. क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलंय, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनन्या नेहमीच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असते. शिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनन्याने अभिनेत्री तारा सुतारिया अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासोबत ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज गुरुवारी सकाळी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला भेटण्यासाठी गेला होता. तो तेथे सुमारे 15 मिनिटे थांबला. आर्यनच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटायला आला होता. यापूर्वी बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यन खान आणि इतर 8 जणांना 3 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. क्रूझ जहाजावर एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.