सोलापूर : सोलापुरातील नावाजलेली लक्ष्मी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आले आहेत. खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येणार आहे. यामुळे खातेदारकांचा संताप पाहवयास मिळत आहे. आधीच कोरोनामुळे हातातला पैसा गेलाय. त्यात या प्रकारामुळे खातेदार वैतागले आहेत.
लक्ष्मी बँकेच्या थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याने व्यवहारावर निर्बंध आल्याचे कारण दिले जात आहे. बँकेत कॅश रकमेचा तुटवडा आहे. म्हणून बँकेने केवळ 5 हजार रुपये आठवड्याला काढता येतील असा सूचना खातेदारांना दिल्या आहेत.
काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, त्यामुळे खातेदारांनी घाबरून जावू नये असे आवाहन संचालक मंडळाकडून केले जात आहे. सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, माळशिरस असा बँके कार्यविस्तार आहे. या तालुक्यात बँकेची शाखा आहेत. या लक्ष्मी बँकेने अनेक लहान मोठ्या व्यक्ती आणि उद्योगाना आर्थिकसहाय्य करुन मोठे केले आहे. बँक खूप जुनी असून हिची स्थापना 1929 रोजी झाली आहे.
खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कर्जाच्या मोबदल्यात ठेवण्यात येणारे तारण देखील कर्जवाटप क्षमतेच्या दुप्पट एवढे आहे त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे. मात्र अनेकांच्या एफडीचा कालावधी पूर्ण झाला आहे.
त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामा करिता, लग्न, हॉस्पिटल अशा कारणांमुळे पैशाची गरज आहे. मात्र बँकेतर्फे केवळ 5 हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. यामुळे खातेदारक आणि बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक बँकेच्या शाखेत खातेदार रक्कमेची मागणी करु लागला आहे.
* अक्कलकोट शहर व परिसरात दोन अपघात; दुचाकी वरील दोघे ठार
सोलापूर – अक्कलकोट शहर आणि दुधनी येथे काल दिवसभर झालेल्या दोन विविध अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघे जण ठार झाले.
यापैकी पहिला अपघात अक्कलकोट शहरातील निमगाव बायपास रोडवर असलेल्या शेरिकर चौकात सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातामध्ये दुचाकीवरील देविदास हरिबा हंचाटे (वय ५५) (रा.सेंट्रल चौक,अक्कलकोट) हे शेतकरी जागीच ठार झाले. ते बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून शेताकडे निघाले होते.
त्यावेळी गाणगापूरच्या दिशेने जाणारी एम एच०३-०४२८या क्रमांकाची ईर्टीका मोटर समोरून धडकल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. तर अपघातग्रस्त मोटार उलटल्याने त्यातील तिघे जण किरकोळ जखमी झाले. या अपघाताची फिर्याद मयत हरिबा हंचाटे यांची पत्नी यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी मोटारीचा चालक स्वप्निल गणेश पावनकर (वय३२ रा. कुर्ला, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फौजदार मुजावर पुढील तपास करीत आहेत.
तर दुसरा अपघात दुपारी १२वाजेच्या सुमारास दुधनी (ता.अक्कलकोट) येथील अंबाबाई मंदिराजवळ घडला. या ठिकाणी ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील सय्यद मौलासाहेब बडेखान (वय ४८ रा. दुधनी रेल्वे स्टेशन जवळ) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. काल दुपारच्या सुमारास बडेखान हे आपल्या दुचाकीवरून गावातून शांभवी हॉटेलच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पाठीमागून केए३२- डी-५०५७ या क्रमांकाचा ट्रक धडकल्याने ते गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाले.
या अपघाताची फिर्याद मयत बडेखान यांचा मुलगा मकबूल बडेखान यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिसात दाखल केली. त्या प्रमाणे पोलिसांनी अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत .