सोलापूर : येथील जागृत मारूती मंदिर शेळगी रोड परिसरात तू माझ्या आईला बघून चेष्टा का केला अशी विचारणा केल्यावर 6 जणांनी मिळून एका तरूणाला बेदम मारहाण करून जखमी केले. तर तू आमच्यावर संशय का घेतो असे विचारल्याने तरूणासह त्याच्या आई वडीलांनी मारहाण केले. अशा परस्परविरोधी तक्रारी पोलीसांकडे दाखल झाल्या आहेत.
धीरज परमेश्वर रणखांबे (वय 19, रा. गुजरवस्ती दयानंद कॉलेज जवळ सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, हा शेळगी रस्त्यावरील जागृत हनुमान मंदिराजवळ त्याच्या मोबाईलवर गेम खेळत बसला असताना जवळच थांबलेले अरूण लोखंडे , जीवन सोनवणे, निलेश कुमार, पिनू सोनवणे, महेश कुमार गजधाने, शुभम अरूण रणखांबे (सर्व रा. गुजरवस्ती दयानंद कॉलेज जवळ सोलापूर) या सर्वजणांनी मिळून धीरज शिंगे याची आई मेडिकलला औषधे घेण्यासाठी जात असताना चेष्टा केली. त्यावरून त्यांना तुम्ही माझ्या आईची चेष्टा का करता असे विचारल्यावरून आरोपींनी मिळून हाताने लाथाबु्नयाने मारहाण करून जखमी केले त्याचवेळी आई वडील हे मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही मारहाण केली अशी फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली त्याचा तपास पोलीस नाईक मनोहर करीत आहेत. तर शुभम अरूण रणखांबे (वय 25, रा. गुजरवस्ती दयानंद कॉलेज शेजारी सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, हा त्याच्या घरात जेवण करीत असताना त्याला त्याच्या मित्राने फोनकरून बोलावून घेतले त्यानंतर तू माझ्यावर संशय का घेतो असे म्हणून विचारणा केल्यावर धीरज परमेश्वर शिंगे, परमेश्वर सामू शिंगे, अंजना परमेश्वर शिंगे या तिघांनी मिळून मारहाण केले लोखंडी कानस ने मारहाण केली दमदाटी केली अशी फिर्याद शुभम रणखांबे याने दिली या दोन्ही परस्पर विरोधी फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.
* 28 लाखाची फसवणुक
सोलापूर : येथील बेगम पेठेत फ्लॅट देतो म्हणून 5 जणांनी मिळून एकाची 28 लाखाची फसवणुक केल्याचे उघड झाले. मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ कुरेशी (वय 32, रा. प्लॉट नं. 201, शाहीन आर्किड तेलंगी पाच्छा पेठ श्रीनिवास टॉकीज जवळ सोलापूर) यांनी दिली.
फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मोहम्मद कुरेशी यांना कर्ज मिळवून देतो म्हणून अनिल श्रीराम, गिता अनिल श्रीराम, अनिकेत अनिल श्रीराम, जुबेर कुरेशी ऊर्फ बिट्टू (रा. 883, शुक्रवार पेठ, खाटीक गल्ली सोलापूर), श्रीशैल मठपती या सर्वजणांनी संगनमत करून 19 लाख 5 हजार रूपये घेतले परंतु कर्ज मंजुर करून मिळाले नाही म्हणून अनिल श्रीराम यांच्या नावावर असलेला खरादी कॉम्प्ले्नस मधील फ्लॅट फिर्यादी मोहम्मद कुरेशी आणि त्याचा भाऊ मेहबुब कुरेशी यांच्या नावावर करून दिले आणि तो फ्लॅट तारण ठेवून त्यावर कर्ज मंजुर करून घेण्यास सांगितले. मंजुर कर्जाची रक्कम आणि 6 लाख रूपये दिल्यानंतर आणखी एक फ्लॅट मेहबुब कुरेशी याच्या नावावर करून देण्यात आला.
परंतु दोन्ही फ्लॅट आरोपींनी भाडेकराराने देवून भाडेकरी सदरचा फ्लॅटचा ताबा देण्यास नकार देत आहेत असे सांगून फ्लॅटची किंमत 25 लाख 50 हजार आणि खरेदीसाठीचा खर्च 2 लाख 40 हजार असा एकूण 27 लाख 90 हजाराची रक्कम घेतली ती परत न देता त्याचा चेक दिला आणि तो चेक खात्यावर पैसे नसल्याने परत आला म्हणून पैसे परत न देता फसवणुक केली अशी फिर्याद मोहम्मद कुरेशी यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत.
* कांदे चोरणाऱ्या दोघांना अटक
सोलापूर – येथील मार्केट यार्डात कांदे चोरणाऱ्या दोघांना वॉचमनने पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवार, 25 आक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
सतीश किसन वाघमारे (वय 43, रा. पी बिल्डींग टिव्ही सेंटर समोर कुमठा नाका सोलापूर), यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, सोलापूर सिध्देश्वर मार्केट यार्डात विनायक शंकर यमगर हे वॉचमन मार्केट यार्डात गस्त घालत असताना कांदा मार्केट एम एस पहिलवान दुकान व प्रधान हॉटेलमधील शेडमध्ये दोघेजण संशयास्पद फिरत असताना पहाटेच्या सुमारास आढळून आले.
त्यांना ताब्यात घेवून चौकशी आणि झडती घेतली असता त्यांच्याकडे 120 किलो कांद्याचे पोते मिळून आले. अनिकेत शहाजी कांबळे, राजू गोरख थोरात (दोघे रा. रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर) असे दोघांनी नाव सांगितले त्यांनी ते कांदे चोरी केल्याचे कबुल केले त्यांना जेलरोड पोलीसांच्या हवाली करून त्यांच्या विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* रिक्षा चालकांनो वाहतुकीच्या नियमांचे पालन करा – सहाय्यक पोलीस आयुक्त
सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी रिक्षा चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे प्रतिपादन शहर वाहतुक शाखचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल लंभाते यांनी केले. शहर वाहतुक शाखेच्या वतीने रिक्षा चालक आणि संघटनेची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी आणि वाहतुक कोंडी टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे तसेच वाहतुकीच्या नियमांची जागृतता झाली पाहिजे असेही सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल लंभाते यांनी यावेळी सांगितले. रिक्षा चालकांनी गणवेश परिधान केला पाहिजे. रिक्षामध्ये रिक्षा चालक व मालक यांचे नाव, मोबाईल नंबर याचा बोर्ड लावला पाहिजे. अशा सूचनांही त्यांनी यावेळी केल्या. तसेच रिक्षा चालकांना येणाऱ्या अडचणी आणि समस्याही त्यांनी जाणून घेवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीला शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, निरगुडे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, पँथर रिक्षा युनियन चे अध्यक्ष बागवान, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष अजिजखान, रिक्षा युनियनचे मुल्ला, एसटी स्टॅन्ड रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळे यांच्यासह रिक्षा चालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
* महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील ६ दरोडेखोरांना अटक; २४ लाखाचा माल जप्त
सोलापूर – कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे हरीयाणा राज्यातील ट्रक चालकाचे हातपाय बांधून त्याच्या नवीन वाहनाचे टायर, इतर साहित्य आणि रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील ६ दरोडेखोरांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य, रोख रक्कम आणि गुन्हयात वापरलेले वाहन असा एकूण २४ लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला. अटकेतील सर्व दरोडेखोर हे उस्मानाबाद जिल्हा परिसरातील असून त्यांना पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
नितीन हिरामण शिंदे (वय २७), शंकर शिवाजी पवार (वय२१) बबलू तात्या पवार (वय१९),श्रीकृष्ण अंकुश पवार (वय१९), राहुल विक्रम पवार (वय२२) आणि अर्जुन बालाजी शिंदे (वय २३सर्व रा. खामकरवाडी ता.वाशी जि.उस्मानाबाद) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहे. त्यांना ३० आक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अजितसिंग बाबूलाल (रा. पलवल, हरियाणा) हे १३ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथून नवीन चेस मिक्सर घेऊन गुजरात येथे निघाले होते. पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंदलगाव येथे त्यांचे वाहन आले असता जीपमधून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर बेदम मारहाण करीत त्यांचे हात-पाय बांधून काही अंतरावर त्यांना वाहनात डांबून नेले. आणि त्यांच्या वाहनाचे दहा टायर आणि इतर साहित्य काढून घेऊन दुसऱ्या ट्रक मध्ये घालून पसार झाले होते. या घटनेची नोंद मंद्रूप पोलिसात झाल्यानंतर पोलिसांनी सहा ते सात अनोळखी आरोपीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता .
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक निरीक्षक नागनाथ खुणे आणि फौजदार शैलेश खेडकर यांच्या पथकाने केला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपी हे उस्मानाबाद परिसरातल असल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व दरोडेखोरांना अटक केली. आणि त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील दरोडेखोराकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .