अहमदनगर : वेतनासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. काल राज्य सरकारने अटी मान्य केल्याने आंदोलन मागे घेतले. अशातच आज शुक्रवारी सकाळी परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर एसटी महामंडळ आणि कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय 56) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
आंदोलन मागे घेतलेले असतानाच आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे कळते.त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती भेटली नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याची माहिती आहे.
सुरू असलेलं एसटी बंद आंदोलन हे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आज शुक्रवारी लगेच शेवगाव आगारात दिलीप हरिभाऊ काकडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत,आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अखेर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे
– आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला होता, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. त्यातच आता कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. तसेच घरभाडे भत्ता 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यानंतर हा बंद कर्मचाऱ्यांनी मागे घेतला.
गेले अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.
एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय
प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम होते.